Narendra Modi Welcomes Donald Trump
Narendra Modi Welcomes Donald Trump 
देश

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन; २२ किलोमीटरच्या रोड-शोला प्रारंभ

सरकारनामा ब्युरो

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी  अहमदाबादच्या विमानतळावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनापूर्वी सुमारे एक तास आधी मोदी विमानतळावर उपस्थित होते. एअरफोर्स वन या आपल्या अधिकृत विमानातून ट्रम्प भारतात आले. 

यांच्या या भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि रणनितीक सहकार्याबाबत अनेक मोठे करार होणे अपेक्षित असून, अर्थकारणाच्यादृष्टीने कळीचा विषय असणारा आयातशुल्काचा मुद्दा मात्र तसा अधांतरी राहू शकतो. ट्रम्प हे तब्बल ३६ तास भारतामध्ये असतील. मोदी आणि ट्रम्प यांच्यात मंगळवारी चर्चा होणार असून, यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण- सुरक्षितता, दहशतवादविरोधी रणनीती, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील अमेरिकेचा तालिबान्यांसोबतचा प्रस्तावित शांती करार आणि आशिया प्रशांतमधील स्थिती आदी मुद्दे केंद्रस्थानी असतील. 

ट्रम्प यांच्या शिष्टमंडळात अर्थमंत्री स्टीव्हन न्यूचीन, वाणिज्यमंत्री विल्बर रॉस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन आणि ऊर्जामंत्री डॅन ब्राऊलाईट यांचा समावेश आहे. ट्रम्प यांचा दोन दिवस भारतात मुक्काम आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT