Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांना 2100 कोटींचा दंड बसणार का? 'या' प्रकरणी लवकरच येणार निर्णय!

Mayur Ratnaparkhe

New York News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील नागरी फसवणूक प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या प्रकरणी निर्णय येऊ शकतो. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी कर्जदारांना फसवण्यासाठी आपल्या संपत्तीबद्दल चुकीची माहिती दिली.

जर या प्रकरणात ट्रम्प(Donald Trump) दोषी आढळले तर त्यांना तब्बल 25 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 2100 कोटींचा दंड ठोठवला जाऊ शकतो. एवढंच नाही तर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये व्यवसाय करण्यासही बंदी घातली जाऊ शकते. 2024च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे प्रबळ दावेदार असलेल्या ट्रम्प यांना यामुळे फार मोठा झटका बसू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हे आरोप पूर्णपणे फेटाळले असून, आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती आर्थर अँगोरोन 11 जानेवारी 2024 रोजी निकाल देऊ शकतात.

न्यूयॉर्कचे अटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी बुधवारी एक प्रसिद्धिपत्रक जारी करून सांगितले की, सुनावणी दरम्यान ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेल्या फसवणुकीचा पूर्णपणे खुलासा झाला आहे.

तर ट्रम्प यांचे वकील क्रिस किसे यांनी म्हटले आहे की, 11 आठवड्यांच्या सुनावणीत हे स्पष्ट झाले आहे की कोणतीही फसवणूक झालेली नाही आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT