Maharashtra news : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी सोशल मीडियात भारतविरोधी पोस्ट करत खळबळ उडवून दिली होती. त्यावरून ट्रम्प यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. अमेरिकेतील एका कट्टरतावादी लेखकाच्या व्हिडीओचा आशय ट्रम्प यांनी पोस्ट केला होता. त्यामध्ये भात आणि चीनसारख्या देशांचा उल्लेख ‘हेल होल’म्हणजे नरक म्हटले होते. भारताकडून त्यावर आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर इराणही भारतासाठी धावून आला आहे.
इराणने अमेरिकेला आरसा दाखवत आधी भारतात येऊन बघा आणि नंतर बोला, असे सुनावले आहे. जन्माच्या आधारावर अमेरिकेत नागरिकता मिळण्याच्या कायद्याशी संबंधित पोस्टमध्ये भारत आणि चीनला ‘नरक’ म्हटले आहे. ही पोस्ट इराणच्याही जिव्हारी लागली आहे. इराणच्या मुंबईतील दूतावासाकडून सोशल मीडियात याबाबत ट्रम्प यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
इराणच्या दूतावासाने म्हटले आहे की, ट्रम्प यांना ‘सांस्कृतिक डिटॉक्स’ची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्यातून ‘बकवास’ बाहेर येईल, अशा अर्थाची ही पोस्ट आहे. कधीतरी भारतात येऊन बघा, मग बोला, असा टोलाही लगावला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील विकास, गणेशोत्सव आणि हिरवागार सह्याद्री, धबधबे, मुंबईतील उंच इमारती, उड्डाणपूल आदींचा समावेश असलेला खास व्हिडीओही सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
इराण दूतावासाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. तब्बल दहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी शेअर केला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या पोस्टवरून भारतानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही पोस्ट अज्ञानपूर्ण आणि अयोग्य असल्याे म्हटले आहे.
पोस्टवरून वाद झाल्यानंतर अमेरिकेकडून सारवासारव करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भारत एक महान देश असून त्याचे नेतृत्व त्यांचे चांगले मित्र करत आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्रम्प यांची टिप्पणी स्पष्टपणे अनुचित आणि अभद्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.