US Stock Market: मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणधील युध्द थांबल्याचे सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येत असताना पुन्हा मोठा झटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठं विधान करत पुन्हा एकदा युध्दाचे संकेत दिले आहे. त्यानंतर भारतीय शेअर बाजार गडगडला आहे.
मुंबई शेअर बाजार बुधवारी ट्रम्प यांच्या विधानानंतर काही वेळात तब्बल १९०० अंकापर्यंत खाली आला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ५५० अंकांची घसरण झाली आहे. या घसरणीचा संबंध ट्रम्प यांच्या विधानाशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा संकटाचे ढग घोंघावण्यास सुरूवात झाली आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत बेधडक विधान करत पुन्हा युध्दाचे संकेत दिले आहेत. आता इराणसोबत कोणतीही नवी डील करावी, असे वाटत नाही. इराणसोबत समझोता करण्याचा काळ आता संपला आहे, असे ट्रम्प मीडियाशी बोलताना म्हणाले आहे. ते आजारी लोक आहेत, मी त्यांच्यासोबत डील करू इच्छित नाही. हा मुद्दाच आता संपला आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने इराणवर काही तासांपूर्वी जोरदार हल्ला केला आहे. यावर ट्रम्प म्हणाले, काल रात्री आम्ही इराणमधील खूप खतरनाक लोकांवर हल्ला केला आहे. आम्ही म्हटले होते, अंत्यसंस्काराची तयारी करता. तर त्यांनी काल जहाजांवर रॉकेट डागली. त्यामुळेच काल आम्ही त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणनेही काही आखाती देशांवर क्षेपणास्त्र डागली आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे आता पुन्हा एकदा अमेरिका-इराण युध्दाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने इराणला दिलेली कच्चे तेल उत्पादन व विक्रीची सवलतही रद्द केली आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.