Donald Trump to join bjp
Donald Trump to join bjp Sarkarnama
देश

Donald Trump To Join BJP?: डोनाल्ड ट्रम्पही भाजपमध्ये ? ; त्यांचे सूटबूट वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ..

सरकारनामा ब्यूरो

Donald Trump to join bjp uddhav thackeray taunt bjp : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल (मंगळवारी) मध्यरात्री अटक करण्यात आली . एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

कोर्टाने ट्रम्प यांच्यावर केलेल्या कारवाईवरुन ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला टोला हाणला आहे. आता डोनाल्ड ट्रम्पही भाजपमध्ये प्रवेश करून आरोप मुक्त होणार आहेत, असा टोला दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

"भ्रष्टाचारी मंडळी भाजपमध्ये येत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कौतुक वाटत असेल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांचे सूटबूट भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. त्यामुळे ईडी आणि सीबीआयने फक्त कपडे वाळत घालून त्याला कडक इस्त्री करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे आहे," अशा शब्दात अग्रलेखात भाजपचा चिमटा घेण्यात आला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान प्रौढ चित्रपट अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपाशी संबंधित फौजदारी खटल्याच्या संदर्भात मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजर झाले. येथील न्यायालयात हजर होताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांना गेल्या आठवड्यात मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने दोषी ठरवले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतं. ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर मॅनहट्टन कोर्ट ते ट्रम्प टॉवरपर्यंत तब्बल 35 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

एकेकाळी सीबीआय म्हणजे काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असल्याचा आरोप मोदींनी केला होता. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. त्यामुळेच सीबीआयचा पोपट मालक सांगेल त्याप्रमाणे विटू विटू किंवा मिठू मिठू करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा मोदींसाठी ढवळ्या आणि पोवळ्यासारखं काम करत आहे, असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे..

  1. केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यास हातभार लावला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचा सौदा करून विकला. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?

  2. मोदींनी सीबीआयच्या स्थापनेवेळी केलेले भाषण हे भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. आमच्या विरोधकांना सोडू नका. भाजप तुमच्या पाठीशी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT