IPS  Jagdish Adhalli 

 

Sarkarnama

देश

चालकाचा मुलगा बनला IPS अधिकारी; सर्व स्तरातून होतेय कौतुक

जगदीश अडहळ्ळी (IPS  Jagdish Adhalli) यांची कृष्णा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस (SP)म्हणून नियुक्ती झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

अथणी : मनात ठरवले आणि जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असल्यास यशापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. याचाच प्रत्यय बेळागावातील (Belgaon) मोळे गावात आला आहे. चालक म्हणून काम करणारे वडील श्रीकांत अडहळ्ळी यांनी आपल्या मुलास प्रोत्साहन दिल्याने त्यांचा मुलगा जगदीश अडहळ्ळी (IPS  Jagdish Adhalli ) हे आज आयपीएस अधिकारी (IPS) बनले आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे मोळे गावचा लौकिक वाढला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

जगदीश अडहळ्ळी हे युपीएससी (UPSC) परीक्षेत 440 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांची आंध्रप्रदेश (Andhrapradesh) केडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमध्ये 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जगदीश यांची आता कृष्णा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस (SP)म्हणून नियुक्ती झाली आहे.

जगदीश यांचे प्राथमिक शिक्षण कवलगूड, माध्यमिक शिक्षण मोळे हायस्कूल, पदवीपूर्व शिक्षण अथणी तर, पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगाव येथील गोगटे कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली‌‌. त्यासाठी दिल्ली येथे कोचिंग क्लास लावला होता. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (KPSC) 2019 च्या बॅचच्या केएएस परीक्षेत 23 वा क्रमांक मिळविलेल्या जगदीश अडहळ्ळी यांनी यापूर्वी कलबुर्गी येथे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून सुद्धा काम केलेले आहे.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी जगदीश एक आदर्श ठरले आहेत. कठोर परिश्रम करून परीक्षा देत त्यांनी आपले पालक आणि गावचा नावलौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. याचे एक उत्तम उदाहरण जगदीश यांनी घालून दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, आपला मुलगा आयपीएस अधिकारी झाल्याने त्याचा आपणास अभिमान वाटत असून आर्थिक परिस्थिती नसतानाही जगदीश यांनी या पदापर्यंत मजल मारल्याने आमच्या कुटुंबीयांची व गावाचे नाव मोठे केले असल्याचे वडील श्रीकांत अडहळ्ळी यांनी सांगितले. तर, ग्रामीण तरुणांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पहावीत. त्याला आत्मविश्वास, जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यशापासून कोणीही रोखू शकणार नाही, आयपीएस जगदीश अडहळ्ळी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT