Russia Ukraine War
Russia Ukraine War  Sarkarnama
देश

रशिया-युक्रेन युद्धामुळं जगावर कोसळणार मोठं संकट; महागाईचा आगडोंब उसळणार!

सरकारनामा ब्युरो

किव्ह : रशिया (Russia) पुकारलेल्या युद्धामुळं युक्रेनमधून (Ukraine) होणारी अन्नधान्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळं युरोप आणि आफ्रिकेमध्ये अन्नधान्याच्या कमतरतेचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला देर व्हॉन यांनी दिला आहे. तीन महिने पूर्ण होऊनही युद्ध संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नसून, यामुळं महागाईचा आगडोंब उसळण्याची चिन्हे आहेत. (Russia-Ukraine War)

रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण करून युद्ध सुरू केले. या युद्धाला आज तीन महिने पूर्ण झाले आहेत. युक्रेनचा पूर्वेकडील काही भाग रशियाच्या ताब्यात गेला आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर धान्याचे उत्पादन होते. हे धान्य आफ्रिका खंडातील देशांमध्ये निर्यात केले जाते. मात्र, रशियाने अझोव्हचा समुद्र आणि काळ्या समुद्रात युद्धनौका तैनात करून हल्ले सुरु ठेवले असल्याने ही निर्यात ठप्प झाली आहे. यामुळं अन्नधान्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असे उर्सुला यांनी म्हटलं आहे.

जगभरात अन्नधान्याच्या दरांमध्ये वाढ होऊन महागाई वाढण्याची शक्यताही वर्तविली होत आहे. यातच युक्रेनच्या गोदामांमध्ये निर्यातीविना पडून असलेल्या धान्याची रशिया चोरी करून ते इतर देशांमध्ये विकत आहेत, असा धक्कादायक आरोप युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दीमित्रो कुलेबा यांनी केला आहे. युक्रेनमधून धान्य जहाजांवर लादून ही जहाजे तुर्कस्तानच्या दिशेला रवान होत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचे तीन महिने

रशियाकडून अत्यंत वेगाने मोहीम राबवित युक्रेनवर ताबा मिळवला जाईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात युक्रेनचे सैनिक आणि नागरिकांनी चिवट प्रतिकार केल्याने रशियाचा वेग मंदावला. यामुळे रशियाने सध्या युक्रेनच्या पूर्व भागावर लक्ष दिलं आहे. किव्ह, खारकिव्ह या शहरांचा ताबा घेण्यात रशियाला अपयश आलं आहे. असं असलं क्षेपणास्त्र आणि रणगाड्यांमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या हल्ल्यांनी मोठं नुकसान केले आहे. युक्रेनला पश्चिमी देशांचं बळ मिळू लागताच रशियासोबतची शांतता चर्चाही आता बंद आहे. युक्रेनमधील पूर्वेकडील मारिउपोल हे महत्त्वाचे बंदर मात्र रशियाच्या ताब्यात गेले आहे. सध्या पूर्वेकडील दोन्बास भागावर रशियाकडून जोरदार हल्ला सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT