A Maruti Suzuki car is pictured outside a dealership as the Raipur Consumer Commission delivers a landmark verdict on E20 petrol compatibility and consumer rights. Sarkarnama
देश

E20 Petrol: "तुम्ही कोण आहात?" इथेनॉलमिश्रित पेट्रोलबाबत महत्वाची मागणी करणाऱ्याला सुप्रीम कोर्टानं झापलं; सरकारनंही घेतला 'युटर्न'

E20 Petrol: देशात सध्या इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा मुद्दा ऐरणीवर आला असून याविरोधात लोक तीव्रपणे आपल्या भावना व्यक्त करायला लागले आहेत.

Amit Ujagare

E20 Petrol: देशात सध्या इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा मुद्दा ऐरणीवर आला असून याविरोधात लोक तीव्रपणे आपल्या भावना व्यक्त करायला लागले आहेत. त्यातच सुप्रीम कोर्टात यापूर्वी दोनदा याचिकाही दाखल झाल्या होत्या, पण कोर्टानं त्या फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर आता एक नवी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. यामध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर इथेनॉलमिश्रीत पेट्रोलबाबतचा बोर्ड लावणं बंधनकारक करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती. पण कोर्टानं याचिकाकर्त्याची ही विनंती धुडकाऊन लावत तुम्ही कोण आहात? अशा शब्दांत त्याला झापलं. तसंच त्याची याचिकाही फेटाळून लावली.

सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

अॅड. नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. सोमवारी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. यावेळी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सुंदरेश यांनी याचिकाकर्ते अॅड. गोस्वामी यांना त्यांची ओळख विचारली, तुम्ही कोण आहात? असा त्यांना प्रश्न केला. या प्रश्नावर गोस्वामी म्हणाले, मी याचिकाकर्ता म्हणून वैयक्तिकरित्या हा खराखुरा मोठा वादाचा विषय उपस्थित केला आहे.

सरकारनं यापूर्वी इथेनॉलमिश्रीत पेट्रोलच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, हा केवळ एक प्रयोग आहे. पण यावर सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल वेंकटरमनी यांनी गोस्वामी यांचा दावा नाकारला. आपण सरकारच्यावतीनं असं कुठलंही विधान केलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच याचिकार्त्याच्या मुद्द्याला उत्तर द्यायला सरकार बांधील नाही असंही कोर्टासमोर सांगितलं.

कोर्टानं दोन याचिका फेटाळल्या

तसंच यापूर्वी सुप्रीम कोर्टात सरकारच्या इथेनॉलमिश्रीत पेट्रोलच्या धोरणाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्या दोन्ही याचिका कोर्टानं फेटाळून लावल्या आहेत, असं कोर्टाला सांगितलं. यानंतर कोर्टानं याचिकाकर्ते गोस्वामी यांची याचिका कलम ३२ ला अनुसरुन फेटाळून लावली. तसंच याचिकाकर्त्यांना आदेश दिले की त्यांनी यासंदर्भात हायकोर्टात जावं.

याचिकेत नेमकं काय म्हटलं होतं?

अॅड. नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटलं की, कोर्टानं सरकारला आदेश द्यावेत की, त्यांनी देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये किती प्रमाणात इथेनॉलचं मिश्रण केलं आहे याची माहिती ठळकपणे पेट्रोलपाईपच्या नोझलजवळच लावावी. यासाठी विशिष्ट वेळही निश्चित करुन द्यावी. तसंच पेट्रोल भरल्याच्या प्रत्येक बिलावर किती टक्के इथेनॉलमिश्रीत पेट्रोल ग्राहकाला विकलं याची माहिती प्रिंट करावी. तसंच सरकारनं प्रत्येक वाहनाचा डेटा पब्लिश करावा ज्यात ते वाहन इथेनॉलला कम्पॅटिबल आहे की नाही हे कळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT