Arun Goel Sarkarnama
देश

ECI Commissioner Arun Goel Resign : मोठी बातमी! निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा

Election Commission Of India News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

India Political News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी (ता. 9) तडकाफडकी आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. गोयल यांच्या अचानक राजीनाम्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा टर्म) कायदा, 2023 च्या कलम 11 च्या खंड (1) नुसार, स्वीकारण्यात आला आहे. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे आता संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर आली आहे. (Election Commission Of India)

दरम्यान, अरुण गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी निवडणुकीची सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक राज्यांना भेटीही दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दिलेल्या अचनाकच राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

अरुण गोयल हे पंजाब केडरचे माजी IAS अधिकारी आहेत. त्यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता. मात्र त्यांनी लोकसभेच्या तोंडावरच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापूर्वी गोयल यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून काम केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT