Bhupesh Baghel Sarkarnama
देश

Mahadev App Case : निवडणुकीआधी काँग्रेसचा बडा नेता अडचणीत; महादेव अॅप प्रकरणात गुन्हा

Rajanand More

Chhattisgarh News : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी (Mahadev App Case) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, षडयंत्र संबंधित विविध कलमांसह भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यातील कलमांचाही एनआयआरमध्ये समावेश आहे. बघेल यांच्यासह या अॅपच्या प्रमुखासह एकूण 21 जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅप प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडूनही केला जात आहे. बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हे छत्तीसगड आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ईडीच्या (ED) चौकशीही टांगती तलवारही बघेल यांच्यावर असणार आहे.

बघेल यांनी मुख्यमंत्री असताना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) असलेल्या अॅपच्या मालकांकडून 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या महादेव अॅपचा मालक तुरूंगात आहे. त्याला मनी लाँर्डिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बघेल यांच्याविरोधात चार मार्च रोजीच गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याबाबतची माहिती आता समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावरच हा गुन्हा दाखल झाल्याने बघेल यांच्यासह काँग्रेसही बॅकफूटवर गेली आहे. प्रचारामध्ये भाजपकडून (BJP) याचा जोरदारप्रमाणे वापर केल जाण्याची शक्यता आहे.

काय आहे महादेव अॅप प्रकरण?

महादेव बेटिंग अॅप ऑनलाईन सट्टेबाजीसाठी बनवण्यात आले होते. त्यावर पोकर, कार्ड गेम्स असे लाईव्ह गेम्स खेळता येत होते. त्याचप्रमाणे क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल असे खेळ आणि निवडणुकांमध्ये सट्टेबाजीही केली जात होती. या अॅपमध्ये उघडण्यात आलेली खाती सर्वाधिक छत्तीसगडमधील होती. या अॅपमध्ये पैसे टाकणाऱ्या ग्राहकांपैकी केवळ ३० टक्केच ग्राहक जिंकतील, अशी सेटिंग त्यामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे मालकांना मोठा फायदा होत होता. अवैध पध्दतीने चालणाऱ्या या अॅपमध्ये अनेकांची नावे समोर आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT