ED News : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना ईडीने शनिवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली. चंडीगड येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पहाटे छापा टाकला नंतर तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत अरोरा यांना अटक केली.
त्यांना आज स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार असून, अधिक चौकशीसाठी ईडी त्यांची कोठडी मागणार आहेत. दरम्यान, या कारवाईवर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला.
केजरीवाल म्हणाले, पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर 'ईडी'ने छापा घालून पंतप्रधान मोदी आणि भाजपने पंजाबला आव्हान दिले आहे. भाजप आणि ईडीची अनैतिक युती पंजाब संपुष्टात आणेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
शनिवारी सकाळी सकाळी तब्बल 20 गाड्यांमधून ईडीचे अधिकारी चंदीगढमधील अरेरा यांच्या निवास्थानी आले. या कारवाई दरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईडीच्या या कारवाईअंतर्गत उत्तर भारतातील पाच ठिकाणांवर छापे टाकले.
यात दिल्लीतील दोन ठिकाणे अन् गुरूग्राममधील 'हॅम्प्टन स्काय रिअल्टी लिमिटेड' या कंपनीच्या कार्यालयासह अरोरांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवलेल्या नवीन गुन्ह्याच्या तपासासाठी ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सूडबुद्धीने केली जात आहे. केंद्र सरकार राजकीय हेतू साध्य करण्यासाठी 'ईडी' आणि 'सीबीआय'चा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.