ED has attached properties of Ahmed Patels son in Law and Dino Morea
ED has attached properties of Ahmed Patels son in Law and Dino Morea 
देश

'ईडी'कडून अहमद पटेलांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरियाची कोट्यवधीची संपत्ती जप्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मनी लाँर्डींग प्रकरणात सक्तीवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधीची संपत्ती जप्त केली. गुजरात येथील स्टर्लिंग बायोटेक समूहशी संबंधित हे प्रकरण असून ईडीकडून आज ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली. 

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँर्डींग कायद्याअंतर्गत (PMLA) चार जणांची संपत्ती जप्त कऱण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची 2 कोटी 41 लाख, दिनो मोरिया यांची 1 कोटी 40 लाख, डीजे अकील नावाने प्रसिध्द असलेले अब्दुलखलील बचूअली यांची 1 कोटी 98 लाख तर खान यांची सुमारे दोन कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तीची एकूण किंमत 8 कोटी 79 लाख एवढी आहे. 

स्टर्लिंग बायोटेक समूहाचे संचालक संदेसरा बंधूंनी बँकांकडून 14 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज घेत ते परत केले नाही. या प्रकरणात संदेसरा बंधु आणि इरफान सिद्दीकी यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये दिनो मोरिया यांचाही समावेश आहे. ज्या संपत्तीचा या देवाणघेवाणीमध्ये समावेश आहे, त्या किंमतीचे संपत्ती जप्त कऱण्यात आल्याचे समजते.

स्टर्लिंग बायोटेकचे मालक व संचालकांमधील निथीन संदेसरा, चेतनकुमार संदेसरा व दिप्ती संदेसरा 2017 मध्ये देश सोडून पळाले आहेत. त्यांना विशेष न्यायालयाने फरार आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेची नीरव मोदी व मेहूल चोक्सीने केलेल्या फसवणूकीपेक्षा हा मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT