ED action police officer India : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला धूळ चारली. त्यानंतर प्रशासनातही मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यात १५ वर्षे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या. त्यामुळे निवडणुकीआधीत केंद्रीय निवडणूक आयोगानेही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. निकाल समोर आल्यानंतर काही तासांतच राज्याच्या मुख्य आयुक्तांनी सर्व विभागांना कोणत्याही महत्वाच्या फायलींना हात न लावण्याचे आदेश काढले.
आता सक्तवसुली संचालनालयाने कोलकाताचे पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ही नोटीस जारी करण्यात आल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. बिस्वास हे देश सोडून जाण्याची शक्यता असल्याने ईडीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्रकरण?
ईडीची कारवाई एका मनी लाँन्डिंग प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात बिस्वजीत पोद्दार उर्फ सोना पप्पू हा मुख्य आरोपी आहे. सोना पप्पूच्या आर्थिक गुन्हेगारीशी संबंधित प्रकरणात पोलीस उपायुक्तांना ईडीने अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. पण ते एकदाही हजर झाले नाहीत. आता सत्तांतर झाल्यानंतर ईडीने पुन्हा त्यांच्याभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे.
सोना पप्पू हा दक्षिण कोलकाता मधील बालीगंज भागातील रहिवासी असून त्याच्यावर जमीन हजपणे, खंडणी वसूली, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या प्रकरणांमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणात बिस्वास यांच्या घरावर छापाही टाकण्यात आला होता.
छापेमारीनंतर बिस्वास हे अचानक गायब झाले. त्यानंतर ईडीने त्यांच्या दोन मुलांना चौकशीसाठी बोलावले होते. पण दोन्ही मुले उपस्थित झाली नाही. त्यामुळे आता ईडीने बिस्वास यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. देशातून पळून जावू नये, यासाठी ईडीने हे पाऊल उचलले आहे.
राज्यात ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना केंद्रीय तपास यंत्रणा आणि सरकारमध्ये सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचा दावा यंत्रणांकडून केला जात होता. तृणमूलच्या निवडणूकीचे काम करणाऱ्या आयपॅक या एजन्सीवर छापा टाकल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री तिथे दाखल झाल्या होत्या. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. आता राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर तपास यंत्रणांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.