GST fraud investigation India : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) झारखंड आणि बंगालमधील नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. 800 कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
झारखंडच्या रांचीमध्ये तीन, जमशेदपूरमध्ये एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे छापे टाकले जात आहेत. छापेमारीच्या ठिकाणी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.
दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांनी 14 हजार 325 कोटी रुपयांचे बनावट GST इनव्हॉइस तयार करून 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इन पुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत हा घोटाळा करण्यात आला आहे. ज्या व्यावसायिकांच्या जागेवर छापे टाकण्यात येत आहेत त्यात शिवकुमार देवरा, सुमित गुप्ता, अमित गुप्ता आणि इतरांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
या घोटाळ्यात 'ED'ने यापूर्वी देखील बंगालमध्ये देखील छापेमारी केली होती. झारखंडमध्ये पहिल्यांदाच ही कारवाई केली जात आहे. असा आरोप आहे की या व्यावसायिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे, व्यवसाय प्रतिष्ठाने उभारली आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर केला. वापर करून घेतल्यानंतर या बनावट आस्थापना बंद करण्यात आल्या.
या वर्षी जानेवारीमध्ये संचालनालयाच्या तपास पथकाने रामगडमधील सरुबदेरा आणि धनबादमधील झरिया येथे 100 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त रकमेच्या GST घोटाळ्यात छापे मारी केली होती. त्याचप्रमाणे, पथकाने जमशेदपूर आणि आदित्यपूर औद्योगिक क्षेत्रातील आठ ठिकाणी छापे टाकून 150 कोटी रुपयांचा GST घोटाळा उघडकीस आणला होता.
बनावट इनव्हॉइस करत GST घोटाळ्याच्या या प्रकरणात, खातू श्याम स्टील, जयसुका आयर्न अँड पॉवर, बाबा श्याम स्टील, श्री स्टील, जमशेदपूरमधील जुगसलाई इथल्या विवान एंटरप्रायझेस, एनएच-33वर असलेले रिवाह रिसॉर्ट आणि आदित्यपूर येथील मातेश्वरी अभियांत्रिकीसह इतर अनेक कंपन्या EDच्या चौकशीच्या रडारवर आहेत. दरम्यान, या प्रकरणात तपास यंत्रणेकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.