Eight Ministers of Modi Government slams opposition leaders 
देश

विरोधकांनी धमकावलं! मोदी सरकारच्या बचावासाठी आठ मंत्री उतरले मैदानात

विरोधक अधिकच आक्रमक झाल्यानंतर सभागृहात मार्शल बोलावण्यात आले होते.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारमधील आठ केंद्रीय मंत्री मैदानात उतरले. त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत उलट त्यांनीच धमकावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं सरकार आणि विरोधकांमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. (Eight Ministers of Modi Government slams opposition leaders)

केंद्र सरकारकडून बुधवारी राज्यसभेत 127 व्या घटनादुरूस्तीचे विधेयक संमत झाल्यानंतर विमाविषयक विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विरोधक अधिकच आक्रमक झाल्यानंतर सभागृहात मार्शल बोलावण्यात आले होते. त्यानंतर या गोंधळात वाढच झाली. सभागृहाचे कामकाज स्थगित केल्यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. 

सभागृहात बाहेरून काही लोक आणून महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर गुरूवारी केंद्र सरकारमधील आठ केंद्रीय मंत्र्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. ही मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिलीच जम्बो पत्रकार परिषद ठरली. यावेळी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. सरकारने अधिक विधेयक सादर केली तर यापेक्षा जास्त गोंधळ घातला जाईल, असं विरोधकांनी धमकावलं. त्यामुळं संसदेचं कामकाज आटोपतं घेण्यात आल्याचा दावा जोशी यांनी केला.

वस्त्रोद्योग मंत्री पियुष्य गोयल यांनी विरोधी खासदारांनी महिला मार्शलला धक्काबुक्की केली. संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना होती. बाहेरील व्यक्तींना कुणालाही सभागृहात आणण्यात आले नाही. त्यावेळी केवळ 30 मार्शल होते. त्यामध्ये 18 पुरूष व 12 महिलांचा समावेश होता, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. गोयल यांनी या प्रकाराच्या चौकशीचीही मागणी केली. 

पत्रकार परिषदेत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, कामकार मंत्री भुपेंदर यादव, शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान, संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन उपस्थित होते. 

काय म्हणाले होते शरद पवार?

राज्यसभेतील गोंधळानंतर बुधवारी शरद पवार म्हणाले, मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असे कधीच पाहिलं नाही. महिला खासदारांवर हल्ला करण्यात आला. बाहेरून 40 हून अधिक पुरूष व महिलांना सभागृहात आणण्यात आलं. हे अत्यंत दुर्दैवी असून हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पवार यांनी केली. पवार यांच्यानंतर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा दावा केला. महिला सुरक्षारक्षकांनी विरोधी पक्षाच्या महिला सदस्यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांचा अपमान केला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT