मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2021) सुरु आहे. यात आज विधानपरिषदेमध्ये कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Shivaji maharaj statue desecrated in bengaluru) झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्द्यावर सीमाभाग मंत्रिगटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात निवेदन केले. यावेळी बोलाताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी सभागृहात सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलू शकत नाही. पण मराठी भाषिकांवर आणि मराठी अस्मितेवर हल्ला करणाऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की नाक दाबले की तोंड उघडते असे म्हणत त्यांनी कर्नाटक सरकारला (Karnataka Government) इशारा दिला.
एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १६ डिसेंबरला काही समाज कंटकांनी विटंबना केली. (Shivaji maharaj statue desecrated in bengaluru) त्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM Basavraj Bommai) अशा शुल्लक घटना घडतात हे विधान केले, पण ते अशोभनीय आहे. सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात येण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे. हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण तरीही तिथले सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर दडपशाही करत आहे, त्यांची मुस्कटदाबी करते. त्यांच्यावर कन्नड भाषेची सक्ती करते. मराठी शाळा बंद करणे, मराठी पाट्या काढून टाकणे असे उद्योग करत असते. मात्र त्या-त्या वेळी तिथली जनता संघर्ष करुन कन्नड सरकारला उत्तर देते.
२०११ साली बेळगाव (Belgum) महानगरपालिकेतील महाराष्ट्र एकीकरण समितीची (Maharashtra Ekikarn Samiti) सत्ता बरखास्त करण्याचे पाप कानडी सरकारने करते. मराठीच्या हक्कांसाठी कार्यक्रमांवर बंदी घालणे, परवानगी नाकारणे. विरोध केल्यास खोटे गुन्हे दाखल करते, तुरुंगात टाकते. पण अशा परिस्थितीतही मराठी भाषिक जनतेने आपला संघर्ष सोडलेला नाही. त्यामुळे १ नोव्हेंबर हा दिवस मराठी भाषिक जनता काळा दिवस पाळते. महाविकास आघाडी सरकारनेही हा काळा दिवस पाळते. आपल्या घटनेने सर्वांना निषेध नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे. पण कर्नाटक सरकार सीमाभागातील जनतेचा हा अधिकार नाकारुन १ नोव्हेंबर रोजी देखील दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याचे काम करते. एवढ्या नंतर देखील आपल्या मराठी बांधवांनी आपल्या संघर्षाची धार कमी होवू दिलेली नाही. तसेच महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील १२ कोटी जनताही या संघर्षात मराठी बांधवांसोबत असल्याचे म्हणत त्यांनी सीमाभागातील जनतेला विश्वास दिला.
यानंतर मराठी बांधव आपले ऐकत नाहीत म्हटल्यावर कर्नाटक सरकार आणि स्थानिक गुंडांनी आता गुंडगिरीचा आधार घेत आहे. कन्नड रक्षक वेदिकेसारख्या हिंसक संघटना मराठी बांधवांवर अत्याचार करण्याचे काम करते. यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे लांबच उलट त्यांना पाठिशी घातले जाते. १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिपक दळवींवर शाई फेक करण्यात आली. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे पाप केले. एकूणच आता मराठी भाषिक जनतेवर आणि अस्मितेवर हल्ला करण्याचे काम सुरु आहे. हे जर असेच सुरु राहिले तर एकनाथ शिंदे म्हणाले, मी सभागृहात सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलू शकत नाही. पण मराठी भाषिकांवर आणि मराठी अस्मितेवर हल्ला करणाऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की नाक दाबले की तोंड उघडते असे म्हणत त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.