Eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar | sharad pawar | Uddhav thackeray | Nana Patole  sarkarnama
देश

Maharashtra Assembly election LIVE : निवडणूक जाहीर होताच अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोन वर्षांचे..."

Akshay Sabale

अजितदादा म्हणतात, 'जय महाराष्ट्र'

निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, "मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र!"

शंखनाद म्हणत फडवीसांनी फुंकलं रणशिंग...

आयोगानं निवडणूक जाहीर करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं आहे. 'शंखनाद', असं कॅप्शन लिहित 'आरंभ' है फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Election Commission Press Conference: महाराष्ट्रात 20 तारखेला मतदान असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. 

Election Commission Press Conference: मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा

ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभं राहता त्यांच्यासाठी रांगेत बसण्यासाठी व्यवस्था करा, अशी सूचना आयोगाने केली आहे.

Election Commission Press Conference LIVE Updates महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार

महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार असून १ लाख ८३ हजार मतदान केंद्र आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले

Election Commission News LIVE Updates 3 लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणूक...

देशातील लोकसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानं वाडनाडयची, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारामुळे नांदेडची आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल खासदाराच्या निधनामुळे बशीहाटची जागा रिक्त झाली आहे.  

Election Commission Press Conference LIVE Updates : 13 राज्यातील 49  जागांवर पोटनिवडणूक

उत्तर प्रदेशातील 10, राजस्थानमधील 7, पंजाबमधील 6, आसाममधील 5, बिहारमधील 4, कर्नाटकातील 3, केरळमधील 3, मध्य प्रदेशातील 2, सिक्कीममधील 2, गुजरातमधील 1, उत्तराखंडमधील 1, छत्तीसगडमधील 1, महाराष्ट्रातील 1 जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

Election Commission PC LIVE Updates : मतांचे विभाजन पक्षांसमोर आव्हान..

महाराष्ट्रात महायुतीचे अर्थात शिवसेना ( शिंदे गट ), भाजप आणि राष्ट्रवादी ( अजितदादा पवार ) चे सरकार आहे. तर, विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना ( ठाकरे गट ), काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार )हे पक्ष आहेत. पक्षफुटीनंतर झालेल्या निवडणुकीत सहा पक्षांमध्ये थेट लढत असल्यानं मतांचं विभाजन हे मोठे आव्हान असणार आहे.

निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तर, झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदानाचा कल कायम ठेवला जाऊ शकते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या दोन वेळापासून ( 2014 आणि 2019 ) एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. झारखंडमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी पाच टप्प्यांत मतदान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT