BJP Symbol Lotus
BJP Symbol Lotus Sarkarnama
देश

Elections Results 2023 Live: मोठी बातमी : दोन राज्यात भाजप गड राखणार ; मेघालयात...

सरकारनामा ब्युरो

Election Results 2023 live updates Tripura Meghalaya Nagaland : ईशान्यमधील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्व जागांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप गड राखणार आहे, तर मेघालयात त्रिशंकुची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे, तर नागालँडमध्ये भाजप-नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी (एनडीपीपी)चे सरकार आहे, तर मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)चे सरकार आहे. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा एनपीपी पक्ष आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी तर नागालँड, मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. तीनही राज्यात विधानसभेच्या ६०-६० जागा आहेत.

त्रिपुरामध्ये भाजपने १८ जागांवर विजय मिळवला आहे. १५ जागांवर भाजप आघाडीवर आहे. सीपीआई (एम)ने २ जागावर विजय मिळवला आहे. ९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. तर टिपरा मोथा पार्टीने ८ जागांवर विजय मिळवला असून चार जागांवर आघाडीवर आहे.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा हे बरदोवाली मतदारसंघातून विजयी झाले आहे. भाजपने यावेळी माणिक साहा यांच्या नावावरच ही निवडणूक लढवली होती. तर मेघालयात मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचे भाऊ जेम्स संगमा यांचा पराभव झाला आहे. त्यांना टीएमसीच्या उमेदवाराने पराभूत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.

नागालँड येथे आज ऐतिहासिक घटना घडली आहे. नागालँड राज्यात ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच एक महिला आमदार झाली आहे. त्यामुळे हा दिवस नागालँडच्या राजकीय इतिहासात महत्वाचा ठरला आहे.

भाजप-एनडीपीपीच्या उमेदवार हेकानी जखालु यांनी दीमापूर विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. या विजयाने त्या नागालॅँडच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.दीमापुर विधानसभा मतदार संघातून त्यांनी १५३६ मतांनी हेकानी जखालु या विजयी झाल्या आहेत. त्यांनी लोक जनशक्ती पार्टी (राम विलास पासवान)च्या उमेदवार एजेतो झिमोमी यांचा पराभव केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT