Elon Musk Latest Marathi News Update Sarkarnama
देश

'माझा संशयास्पद मृत्यू झाला तर..! एलॉन मस्क यांच्या ट्विटनं जगभरात खळबळ

सोशल मीडियात लोकांच्या 25 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या असून जवळपास नऊ लाख लोकांना लाईक केले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट करून जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी 'संशयास्पद मृत्यू' बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावरून सोशल मीडियात लोकांच्या 25 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या असून जवळपास नऊ लाख लोकांनी लाईक केले आहे. पण अजूनही त्यांच्या या ट्विटचा अर्थ उलगडलेला नाही. (Elon Musk Latest Marathi News Update)

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क सध्या चर्चेत आहेत. सोमवारी एक ट्विट करत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'जर संशयास्पद स्थितीत माझा मृत्यू झाला तर ते nice knowin ya असेल.' मस्क यांचं हे थेट ट्विट कुणालाही समजलं नसलं तरी त्यांनी 'NICE Knowin Ya' या अल्बममधील गाण्याचा उल्लेख केला आहे.

या ट्विटनंतर नेटकऱ्यांच्या हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी या ट्विटवरून चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'जगाला अजून मस्क यांची गरज आहे. त्यामुळे ते एवढ्या लवकर जाऊ शकत नाही,' असं एका युझरने म्हटलं आहे. तर आपल्याला मस्क यांना कोणतीही किंमत मोजून वाचवावं लागेल, असे एकाने नमूद केले आहे. 'असा विचार गंमतीतही करू नका, अजून तुम्हाला अनेक समस्या सोडवायच्या आहेत, असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे.

44 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतलंय ट्विटर

एलॉन मस्क यांनी मागील महिन्यात 44 अब्ज डॉलर मोजून ट्विटर विकत घेतले आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करण्याचे संकेत दिले आहे. पुढील काळात ट्विटरचा मोफत वापर करता येणार नाही, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. याचा वापर करण्यासाठी काही पैसे मोजावे लागतील. पण सर्वसामान्य युझर्ससाठी ट्विटर मोफत असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठराविक लोकांना पैसै मोजावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT