Mamata Banerjee Injured Sarkarnama
देश

Mamata Banerjee Injured: ममता बॅनर्जींच्या हॅलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग: पायाला आणि पाठीला दुखापत

West Bengal Politics: 8 जुलै रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या उत्तरेकडील जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेल्या होत्या.

सरकारनामा ब्यूरो

Mamata Banerjee Injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी (२७ जून) दुपारी खराब हवामानामुळे सिलीगुडीजवळील सेवोक एअरबेसवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

सीएम ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना एस.एस.के.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यामध्ये आणि डाव्या नितंबाच्या सांध्यामध्ये लिगामेंटला दुखापत झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयातील निष्णात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयातच राहण्याचा सल्ला देण्यात आला. पण त्यांनी आपल्यावर घरीच उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधून विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात बॅनर्जी यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. नंतर त्या बागडोगरा विमानतळावरून विमानाने कोलकाता येथे परतल्या. त्यांना येथील शासकीय एस.एस.के.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णलायता त्यांच्यावर एम.आर.आय. करण्यात आला.

बॅनर्जी जलपायगुडी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केल्यानंतर बागडोगरा विमानतळाकडे जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर वैकुंठपूरच्या जंगलांवरून विमान उडत असताना खराब हवामानाच्या भागात पोहोचले. मुसळधार पावसामुळे पायलटने आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला. 8 जुलै रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या उत्तरेकडील जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेल्या होत्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री बॅनर्जी यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT