European Union Member States will help India over coming days
European Union Member States will help India over coming days 
देश

वसुधैव कुटुंबकम..! संकटाच्या काळात भारताच्या मदतीला धावले जग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा कहर वाढू लागला असून, मदतीसाठी आता जगातील अनेक देश पुढे आले आहेत. युरोपीय समुदायातील सदस्य देश भारताला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांसह इतर वैद्यकीय साहित्याची मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत. याचबरोबर इतरही देश भारताला मदत करीत आहेत. 

युरोपीय समुदायाने म्हटले आहे की, युरोपीय समुदायातील सदस्य देश भारतासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा आगामी काळात करणार आहेत. भारताने यासंदर्भात विनंती केली होती. यानुसार सदस्य देशांकडून पुरवठा केला जाणार आहे. आगामी काळात इतर सदस्य देशांकडूनही भारताला मदत केली जाणार आहे. 

अशी असेल मदत : 
आयर्लंड : 700 ऑक्सिजन सिलिंडर, 1 ऑक्सिजन जनरेटर, 365 व्हेंटिलेटर
बेल्जियम : 9 हजार  रेमडेसिव्हिर डोस
रोमानिया : 80 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 75 ऑक्सिजन सिलिंडर
लक्झेम्बर्ग : 58 व्हेटिंलेटर 
पोर्तुगाल : 5 हजार 503 रेमडेसिव्हिर, दर आठवड्याला 20 हजार लिटर ऑक्सिजन 
स्वीडन : 120 व्हेंटिलेटर 

भारतात 24 तासांत 3 लाख 23 हजार रूग्ण 
भारतात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 23 हजार 144 रुग्ण सापडले असून, 2 हजार 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 894 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाख 82 हजार 204 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.34 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.54 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT