Dharmendra Pradhan: NEET पेपर फुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर एकवटलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांचा अखेर विजय झाला आहे. पण तरीही सीजेपीचं आंदोलन अद्याप सुरुच राहणार आहे, त्याच्या मागचं कारणंही सीजेपीनं सांगितलं आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही जरी सीजेपीची प्रमुख मागणी असली तरी अद्याप उर्वरित मागण्या सरकारनं मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळं जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचा सीजेपीच्या समन्वयकांनी सांगितलं आहे. त्यामुळं दुपारी साडेतीन वाजता सरकारसोबत सीजेपीच्या प्रवक्त्यांची तिसरी बैठक होणार आहे. कालच्या दुसऱ्या बैठकीत केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी या प्रवक्त्यांशी चर्चा केल्यानंतर दोन दिवसांत प्रधानांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासनं त्यांना दिलं होतं.
दरम्यान, आजच्या विकेंडमुळं शनिवार-रविवार या दोन्ही दिवशी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनाला आणखी पाठिंबा वाढणार असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर देशभरात आता हा वणवा पेटत चालला होता, त्यामुळं सरकारनं आंदोलन अजून चिघळू नये यासाठी दोन दिवसांचा अवधी सीजेपीच्या प्रवक्त्यांना दिला होता. पण तरीही याची अपेक्षा कुणालाही नव्हती की इतक्या तातडीनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार घेईल, पण अखेर सरकारला जेनझीच्या ताकदीसमोर झुकावं लागलं.
अभिजीत दिपकेनं म्हटलं की, "घाबरण्याचे काहीच कारण नाही, ही लोकशाही आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. आम्ही असेच माघारी जाणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे; पण ज्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. त्या सर्व कुटुंबांना ती रक्कम मिळायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे, २० तारखेला ज्या पोलिसांनी गुंडांसारखी वर्तणूक केली, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. लक्षात ठेवा, झुरळांशी पंगा घेऊ नका."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.