New Delhi News : काही दिवसांपूर्वीच खासदारकी रद्द झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांना दुसरा धक्का बसला आहे. खासदारकी गेल्यानंतर आता त्यांना सरकारी बंगलाही सोडावा लागला आहे. बंगला सोडण्याच्या नोटिशीनंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी हा बंगला सोडला.
महुआ यांची खासदारकी गेल्यानंतर सरकारी बंगला सोडण्याची नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती. त्याविरोधात महुआ यांनी दिल्ली हायकोर्टात (Delhi HighCourt) धाव घेतली होती. नोटीस रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पण हायकोर्टाने गुरुवारी त्यास नकार दिल्याने महुआ यांना बंगल्या सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच सरकारने दुसऱ्या नोटिशीत बंगला रिकामा केला नाही तर आम्ही रिकामा करू, असा इशारा दिला होता.
हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने महुआ (Mahua Moitra) यांच्याकडून शुक्रवारी सकाळीच बंगला रिकामा करण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी केंद्रीय इस्टेट विभागाची टीम त्यांचा बंगला रिकामा करण्यासाठी पोहोचल्याची माहिती होती. त्यांच्याकडून बंगल्यातील सामान बाहेर काढले जात असल्याची माहिती आली होती. पण महुआ यांच्या कार्यालायकडून तसे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महुआ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इस्टेट विभागाचे अधिकारी येण्यापुर्वी बंगला रिकामा करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांचे वकीलही हजर होते. बंगला रिकामा केल्यानंतर चावी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. त्यांच्याकडून बंगला रिकामा करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले.
दरम्यान, लोकसभेत (LokSabha) प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपानंतर महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीत त्या उमेदवार असतील. निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर खासदारांना निकाल लागेपर्यंत बंगल्यात राहता येते. त्यामुळे महुआ यांनाही बंगल्यात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांच्यावतीने हायकोर्टात करण्यात आली होती.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.