Bomb Recovered
Bomb Recovered  Sarkarnama
देश

राजधानीत स्फोटक जप्त; निवडणूक काळात तिसऱ्यांदा घातपाताचा कट उधळला

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : राजधानी दिल्लीत महिन्याभराच्या काळात दुसऱ्यांदा स्फोटक जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक काळात घातपाताचा कट उधळून लावला आहे. दिल्लीच्या जुन्या सीमापुरी भागात काही संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या स्पेशल सेलने त्या भागातील एका घरावर धाड टाकली. त्यावेळी संशयित तिथून फरार झाले होते, मात्र कुलूप तोडून आत गेल्यानंतर पोलिसांना काही कागदपत्र आणि एक संशयित बॅग हाताला लागली. यात तपासानंतर IED मध्ये ३ किलो स्फोटक जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमापुरी भागात सापडलेली स्फोटकं मागील काही दिवसांपूर्वी गाजीपूर सीमा आणि पंजाबमधून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांशी संबंधित आहेत. अलिकडेच काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या कुलू येथील कार स्फोटात देखील अशाच प्रकारच्या स्फोटकांचा वापर झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आज सापडलेली स्फोटक एनएसजीने बॉम्ब डिस्पोजल स्कॉडच्या सहाय्याने दिलशाद गार्डनमध्ये नेवून ८ फूट खोल खड्ड्यात नष्ट केली आहे.

यापूर्वी १४ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी गाझीपूर फूल मंडीजवळ एक बेवारस बॅगेतून स्फोटक आणि तब्बल ३ किलो पर्यंत आयईडी जप्त केले होते. मात्र गाझीपूर भाजी मंडईजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी करण्यात आली होती. त्याचवेळी पंजाबमध्येही ४-५ किलो RDX सापडले होते. याशिवाय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील गुरुदासपूरमध्येही आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्येच लुधियाना येथील न्यायालय संकुलात स्फोट झाल्याची घटना घडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT