JP Nadda, Amit Shah News
JP Nadda, Amit Shah News sarkarnama
देश

नड्डा, शहांचा आदेश डावलला; भाजपच्या पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

सरकारनामा ब्यूरो

Himachal Pradesh Election : सध्या हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी हिमाचलचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने चार माजी आमदार आणि राज्याच्या माजी उपाध्यक्षांवर मोठी कारवाई केली. या पाच सदस्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केले आहे.

निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ३० टक्के जणांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला. मात्र, हे धोरण भाजपच्या माथी पडल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यांनी माघार न घेतल्याने भाजपने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली.

माजी आमदार तेजवंत सिंह नेगी, माजी आमदार किशोरी लाल, मनोहर धीमान, केएल ठाकूर आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष कृपाल परमार यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री जयकुमार ठाकूर यांनी सर्व बंडखोर नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाला डावलून या पाच जणांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे नाराज झालेल्या, वरिष्ठांनी अखेर सर्व बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT