Facebook, meta
Facebook, meta sarkarnama
देश

आता Facebookनव्हे 'meta 'वर भेटा ; लवकरच नव्या रुपात

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक कंपनीने आता आपले नाव बदलले आहे. फेसबुकचे (Facebook Inc) कंपनी आपल्या युझर्सपुढे नव्या रुपात समोर आली आहे. फेसबुकने आपल्या नव्या नावाची घोषणा केली आहे. तिचं नवे नाव आता मेटा असणार आहे.

Facebook कंपनीचे नाव बदलून meta (मेटा) करण्यात आले आहे. फेसबूक कंपनीनं नाव जरी बदलले असले तरी देखील त्यांच्या ॲप फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्स ॲप च्या नावांमध्ये कोणत्याही प्रकारचे बद्दल करण्यात आलेले नाही.

कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही घोषणा करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकचे नाव बदलणार अशी चर्चा सुरू होती, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. फेसबुकने सुरक्षित मेटाव्हर्सची निमिर्ती करणाऱ्या एका ना नफा तत्वावर काम करणाऱ्या गटाला नुकताच 50 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे.

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या मेटावर्स निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. केवळ एकच कंपनी मेटावर्स बनवू शकत नाही. हे विविध तंत्रज्ञानाचे एक मोठे जाळे आहे ज्यावर अनेक कंपन्या एकत्र काम करीत आहेत.​​​​​​​ मेटाव्हर्स पूर्णपणे विकसित होण्यास 10 ते 15 वर्षे लागण्याची शक्यता आहे. 'मेटाव्हर्स' (Metaverse) विकसित करण्यासाठी युरोपात 10 हजार जणांची नियुक्ती करणार असल्याचे फेसबुकने यापूर्वी जाहीर केलं आहे. सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो. पण मेटाव्हर्स मात्र काम, टाईमपास, कॉन्सर्ट्स, सिनेमा किंवा नुसती मजामस्ती करायलाही वापरता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी फेसबुकनं VR आणि AR मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सुमारे तीन अरब यूजर्सला जोडण्याची योजना आहे.

मेटाव्हर्स म्हणजे काय

१)मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल.

२)कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकणार आहे. ३)मेटाव्हर्स हे एक प्रकारचे व्हर्च्युअल जग असेल. या तंत्राद्वारे, तुम्ही व्हर्च्युअल ओळखीद्वारे डिजिटल जगात प्रवेश करू शकाल.

३)एक समांतर जग जिथे तुमची वेगळी ओळख असेल. त्या समांतर जगात तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईकांना भेटू शकाल, प्रवास करण्यापासून, वस्तू खरेदी करण्यापर्यंत सर्व गोष्टी करता येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT