facebook  sarkarnama
देश

फेसबुक, व्हाॅटस अप आणि इन्स्टाग्राम तीनही `ठप्प` : वापरकर्ते झाले बैचेन

जगातील सर्वात मोठ्या सोशल मिडिया फ्लॅटफाॅर्मवर Black Monday

सरकारनामा ब्युरो

पुणे : सोशल मिडियावरील युजर्झना सोमवारी (ता. 4 आॅक्टोबर) रात्री 9.20 वाजता मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. कारण फेसबुक, व्हाॅटस अप आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही `डाऊन` झालेले होते. व्हाॅटस अप आणि इन्साग्राम हे फेसबुकच्याच मालकीचे असल्याने दोन्ही ठिकाणी हाच अनुभल आला. ट्विटर आणि यू ट्यूब हे दोन्ही मात्र सुरू होते. फेसबुक डाऊन झाले आहे का, असा प्रश्न ट्विटवरवच विचारला जात होता. तसा हॅशटॅगही तातडीने जगभरातून सुरू झाला.

पहिल्यांदाच व्हाॅटस अप आणि फेसबुक हे दोन्ही बंद पडल्याचा अनुभव युझर्सना आला. या आधी फेसबुक काही काळासाठी बंद पडण्याच्या घटना झाल्या होत्या. मात्र फेसबुक कंपनीचे तीनही प्लॅटफाॅर्म बंद पडल्याच्या अनुभव पहिल्यांदाच आला. हे तीनही प्लॅटफाॅर्मवरती अब्जावजी युजर्स आहेत. एकटे व्हाॅटस अपच तब्बल 500 कोटी मोबाईलमध्ये डाऊनलोड झालेले अॅप आहे. मोठ्या प्रमाणात व्हाॅटस अप वर संदेशांची देवाणघेवाण सुरू असते. मात्र ती सारी ठप्प झाली.

फेसबुककडून तातडीने यावर कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. वापरकर्त्यांना मात्र आपले मेसेज का जात नाहीत किंवा फेसबुक का ओपन होत नाही, या चिंतेने सतावले होते. फेसबुक का बंद आहे, याचे उत्तर युझर हे ट्विटरवर विचारत होते. दुसरीकडे यू ट्यूब व्यवस्थित सुरू होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT