farmers will hold black day for completing six months protest against farm laws
farmers will hold black day for completing six months protest against farm laws 
देश

शेतकरी आंदोलनाचे सहा महिने अन् उद्याचा काळा दिवस!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या (Farm Laws)  विरोधात सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protests) करीत आहेत. अजूनही सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे 26 मे रोजी शेतकरी काळा दिवस (Black Day) सरकारचा निषेध करणार आहेत, अशी घोषणा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केली. उद्या कुणीही कुठेही गर्दी करणार नाही तसेच, सभा घेणार नाही. दिल्लीतही कोणी मोर्चा काढणार नाही, असेही टिकैत यांनी स्पष्ट केले. 

कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी कृषि कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असून, सरकार ही मागणी स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे सरकारने नंतर आंदोलकांशी चर्चा करणेच बंद केले आहे. शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अनोखा काळा दिवस पाळणार आहेत. यात कोणताही मोर्चा काढला जाणार नाही. याचबरोबर सभाही घेतली जाणार नाही. 

शेतकरी नेता बलबीरसिंह राजेवाल म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला उद्या सहा महिने होत आहेत. यामुळे आम्ही उद्या काळा दिवस पाळणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचाही आम्ही निषेध करणार आहोत. सर्व शेतकऱ्यांनी आपले घर, वाहने आणि दुकानांवर काळे झेंडे लावावेत. आम्ही कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी मोदींचा पुतळा जाळणार आहोत. 

कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी 26 नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि चिल्ला या सीमांवर हे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांतील शेतकरी सहभागी आहेत. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारची कोंडी झाली असली तरी केंद्रातील सर्व मंत्री आणि भाजप नेते या कायद्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT