Tejasvi Yadav, Misa Bharti Sarkarnama
देश

बडे नेते अडचणीत; लोकसभेच्या उमेदवारीसाठी पाच कोटी घेत केली फसवणूक

भागलपूर मतदारसंघातील तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी पाच कोटी रुपये घेतले होते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पैसे घेऊन निवडणुकीत तिकीट देण्याच्या प्रकरणात बड्या नेत्यांवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्यासह त्यांची बहीण खासदार मीसा भारती (Misa Bharti), बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह सहा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेसचे नेते संजीव सिंह यांनी हे आरोप केले आहेत. तेजस्वी यादव यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे घेऊनही तिकीट दिलं नाही, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी भागलपूर मतदारसंघातील तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी पाच कोटी रुपये घेतले होते. पण नंतर त्यांनी आश्वासन पाळलं नाही. या प्रकरणात मीसा भारती व झा यांच्यासह सहा जणांचा समावेश असल्याची तक्रार संजीव सिंह यांनी दिली होती.

तेजस्वी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही सिंह यांनी केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी यादव यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनी यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव हे भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडाले असल्याचा आरोप केला आहे. असे आरोप यापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्यावर अनेकदा केले जात होते. ते आमदार आणि खासदार बनवण्यासाठी खूप पैसे घेत होते, असे मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली तर सत्य समोर येईल. आरोप करणाऱ्याला हेही विचारायला हवे की, त्यांच्याकडे पाच कोटी रुपये कुठून आले. कायदा त्याचे काम करेलच, असं यादव म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT