Aap Leader Gopal Italia
Aap Leader Gopal Italia Sarkarnama
देश

भाजप-आप संघर्ष वाढला : प्रदेशाध्यक्षावर FIR दाखल

सरकारनामा ब्यूरो

गुजरात : गुजरातच्या सुरतमध्ये आम आदमी पार्टीचे (आप) प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आज (३ सप्टेंबर) याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राज्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आर. पाटील आणि राज्यमंत्री हर्ष संघवी यांची बदनामी केल्याचा इटालिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

सुरत शहरातील 'आप' नेते मनोज सोराठिया यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यासाठी भाजपने 'गुंडे' पाठवल्याचे सांगून, इटालियावर पक्षाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्ता प्रताप चोडवाडिया यांच्या तक्रारीवरून उमरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आप नेत्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे गृहमंत्री संघवी यांच्याविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप आहे.

भारतीय दंड संहिता (IPC) कलम 500 (मानहानी), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 505(1)(b) (कोणत्याही व्यक्तीला राज्य किंवा सार्वजनिक शांततेच्या विरोधात गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), आणि 469 (प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने खोटारडे दावे करणे ) अंतर्गत इटालियाविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले आहेत.

31 ऑगस्टला सोराठीयावर झालेल्या हल्ल्यानंतर गोपाल इटालिया यांनी एक व्हिडिओ मेसेज पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. सोरठिया यांच्यावरील हल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. 'आप' नेत्याच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एच. राजपूत म्हणाले की, "सुरत पोलिसांची गुन्हे शाखा या हल्ल्याचा तपास करत आहे."

एका व्हिडिओ संदेशात इटालियाने म्हंटले होते की, "भाजपच्या 100 गुंडांनी" सोराथियावर हल्ला केला." यामुळे इटालियांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT