<div class="paragraphs"><p>Dharma sansad</p></div>

Dharma sansad

 

sarkarnama

देश

अल्पसंख्याकांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य; धर्म संसदेवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : अल्पसंख्याकांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी आणि अन्य वक्त्यांविरोधात पोलिसांनी 'एफआयआर' दाखल केला आहे. हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत त्यागी आणि अन्य वक्त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली. त्यामुळे आता पोलिसांनी एफआयआर दाखल कर कायदेशीर कारवाईचा फास आवळला आहे. त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी याच महिन्यामध्ये मुस्लिम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला होता.

या संसदेत सहभागी झालेल्या अन्य वक्त्यांनीही प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. या सर्वांविरोधात हरिद्वार कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत धर्म संसदेत करण्यात आलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, हिंदुत्ववादी नेहमीच द्वेषाचा प्रसार करतात. त्याची मोठी किंमत हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती लोकांना चुकवावी लागते. मात्र, आता आणखी हे होणार नाही. त्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही आज (ता. २४) धर्म संसदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वक्त्यांनी राज्यघटना आणि कायद्याचा भंग केला असल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनीही आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT