Kumar Vishwas
Kumar Vishwas Sarkarnama
देश

कुमार विश्वास अडचणीत; पोलीस थेट घरी पोहचले

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते आणि कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाब निवडणुकीच्या (Punjab Election 2022) काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी पंजाब पोलीस थेट त्यांच्या घरी पोहचले. त्यावरून राजकारण तापलं आहे.

कुमार विश्वास यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कुमार विश्वास हे आपचे संस्थापक सदस्य आहेत. पण त्यानंतर काही काळाने त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करत आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ते सातत्याने केजरीवाल यांना लक्ष्य करत असतात. पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी केजरीवालांवर निशाणा साधत त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

विश्वास यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. भाजपनेही हा व्हिडीओ शअर केला होता. केजरीवाल यांना पंजाचे मुख्यमंत्री किंवा खलिस्तानचे पंतप्रधान व्हायचे आहे, असा आरोप विश्वास यांनी या व्हिडीओमध्ये केला होता. त्यावरून निवडणुकीदरम्यान राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या व्हिडीओमध्ये विश्वास यांनी केजरीवाल यांचं नाव घेतलं नसलं तरी ते केजरीवाल यांनाच उद्देश असल्याची चर्चा होती. भाजपनेही तसा दावा केला होता.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. आपने त्यावेळी विश्वास हे भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओवरून विश्वास यांच्यावर पंजाबमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बुधवारी पंजाब पोलीस थेट विश्वास यांच्या घरी पोहचले. याबाबत विश्वास यांनीच ट्विट करून माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT