नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) नव्या प्रकाराचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी राजधानी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे भारतातील ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा पाचवर पोहचला आहे. दिल्लीत आढळलेला रुग्ण टांझानिया येथून आलेला आहे. दरम्यान, धारावीमध्ये संशयित कोरोना बाधित रुग्णही टांझानिया येथून आलेला आहे.
देशातील ओमिक्रॉनने शिरकाव केल्यानंतर आरोग्यासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या काही देशांमधील प्रवाशांची कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून आता ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. कर्नाटकत देशातील पहिले दोन रुग्ण आढळल्यानंतर तिसरा रुग्ण गुजरातमध्ये सापडला. तर महाराष्ट्रातील डोंबिवली येथे चौथ्या रुग्णाची नोंद झाली.
आता देशाची राजधानी दिल्लीमध्येही ओमिक्रॉन पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लाघण झाली आहे. तो टांझानिया येथून आलेला आहे. आतापर्यंत परदेशातील आलेले 17 प्रवाशांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबईतील धारावीमध्ये टांझिनियामधून परतलेल्या प्रवाशी कोरोना बाधित आहे. सध्या 7 हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंग चाचणीकरता कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला आहे. या स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. या प्रवाशाच्या कुटुंबियांचीही चाचणी करण्यात आली आहे, त्यांचे रिपार्ट्स उद्या येणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितल्याप्रमाणे पालिकेने बरीच काळजी घेतली आहे. हाय रिस्क ठिकाणांहून मुंबईत आलेले प्रवाशांची तपासणी, उपचार करत आहेत.
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, वॉर रुम सज्ज आहे. हाय रिस्क कंट्रीतु आलेल्या प्रवाशांना कॉल जात आहेत. मात्र ओमायक्रॉन येवूच नये यासाठी पंचसूत्री कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेतला आहे. रुग्णांची बॅक हिस्ट्री चेक केली जाईल. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मास्क आणि सोशल डिस्टंन्सींग हा प्रमुख उपाय असल्याचेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.