Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu Sarkarnama
देश

सिध्दू अडचणीत; मतदारसंघातील जिल्हाध्यक्षांसह पाच नेत्यांनी दिला झटका

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Election 2022) काँग्रेसचे0 प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे अमृतसर पूर्वमधून लढणार आहेत. सिद्धूंचे कट्टर विरोधक माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. या हाय होल्टेज लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण त्याआधीच सिद्धूंना धक्का बसला आहे.

अमृतसर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) अध्यक्ष भगवंतपाल सिंग यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील पाच नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अमृतसह काँग्रेससह सिध्दूंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांनी पंजाब हे काँग्रेस मुक्त होण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केलं.

काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांमध्ये भगवंतपाल सिंग यांच्यासह प्रदीप सिंग भुल्लर, रतन सिंग सोहाल, परमजित सिंग रंधावा आणि तजिंदरपाल सिंग यांचा समावेश आहे. शनिवारीच मोगा विधानसभा मतदारसंघातील आमदाराने उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच अमरिंदरसिंग यांनीही काँग्रेसविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसने शनिवारी जाहीर केलेल्या 86 उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे राखीव चमकौर साहिब मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. यादीत प्रतापसिंग बाजवा (काडियन), सुखजिंदरसिंग रंधावा (डेरा बाबा नानक), परगतसिंग (जालंधर कॅन्टोन्मेंट) या बड्या नेत्यांचा समावेश आहे. मागील वर्षभर अमरिंदरसिंग विरुद्ध सिद्धू असा वाद काँग्रेसमध्ये सुरू होता. यात अमरिंदरसिंग यांना सुरवातीला मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर त्यांनी पक्षाला रामराम केला होता.

अमरिंदरसिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस (Punjab Lok Congress) हा नवीन पक्ष स्थापन केला आहे. राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या भाजपसोबत (BJP) त्यांचा पक्ष मैदानात उतरला आहे. आता या पक्षाला निवडणूक आयोगाने हॉकी स्टिक आणि बॉलचे चिन्ह मिळाले आहे. कॅप्टन यांनी नवीन पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस, असे जाहीर केले होते. त्यांनी नावात काँग्रेसचा वापर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता त्यांना हॉकी स्टिकसह बॉलचे चिन्ह मिळाले आहे. पंजाबमधील हॉकीच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना काही प्रमाणात होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT