Himachal Pradesh Result
Himachal Pradesh Result Sarkarnama
देश

Himachal Pradesh Election: भाजपचे पाच बडे मंत्री हिमाचलमध्ये पराभवाच्या छायेत!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशने (Himachal Pradesh) आपली परंपरा कायम राखली आहे. कोणत्याही एका पक्षाकडे सलग दोन वेळा सत्ता न देण्याची हिमाचलच्या जनतेची खासियत आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने हिमाचलची सत्ता भाजपच्या (BJP) हातून हिसकावल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विजय मिळविला असला तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्री पराभवाच्या छायेत आहेत, त्यामुळे हिमाचलमध्ये भाजपला सत्ता गमावण्याबरोबरच बड्या नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागण्याची शक्यता आहे. (Five senior ministers of BJP in the shadow of defeat in Himachal Pradesh)

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसने जवळपास ४० जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजप २५ जागांवर अडकला आहे. तीन जागांवर अपक्ष पुढे आहेत. बहुमतासाठी ३५ जागा जिंकण्याची आवश्यकता असून काँग्रेस ४० जागांवर पुढे आहे. भाजपची सत्ता जाण्याबरोबरच बड्या नेत्यांना धक्के बसू शकतात.

हिमाचल प्रदेशमध्ये कायदा मंत्री तथा शहरी विकास मंत्री सुरेश भारद्वाज, वनमंत्री राकेश पठानिया, आरोग्य मंत्री डॉ. राजीव सैजल, शिक्षण मंत्री डॉ. रामलाल मरकांडा, याशिवाय ठाकूर सरकारमधील बडे प्रस्थ तथा कॅबिनेट मंत्री गोविंद ठाकूर हे पाच मंत्री पिछाडीवर आहेत. हे सर्व भाजपचे नेते हिमाचलच्या राजकारणातील दिग्गज नेते मानले जातात. त्यामुळे ते पिछाडीवर राहणे भाजपसाठी धक्कादायक ठरू शकते.

कसुम्पटी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे कायदा मंत्री सुरेश भारद्वाज यांना १६ हजार ८२० मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस अनिरुद्ध सिंह यांना २५ हजार २५१ मते मिळाली आहेत. मंत्री भारद्वाज हे तब्बल ८ हजार ५०० पिछाडीवर आहेत. वनमंत्री पठानिया हे फतेहपूरमधून लढत असून त्यांना २४ हजार ८७७ मते मिळाली आहे, तर काँग्रेसचे भवानी पठानिया यांनी ३१ हजार ७९३ मते घेतली आहेत. त्यांनी ८ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

आरोग्य मंत्री डॉ सैजल यांनी कसैली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी २० हजार ९३० मते घेतली आहेत. त्यांचे विरोधक काँग्रेस उमेदवार विनोद सुल्नातपुरी यांना २७ हजार ३७७ मते घेतली आहेत. त्यांच्याकडे सहा हजार मतांची आघाडी आहे. लाहौलस्पिती मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिक्षण मंत्री रामलाल मरकांडा हे पिछाडीवर आहेत. मात्र त्यांची काट्याची लढत आहे. मरकांडा यांना ८०५८ मते मिळाली असून काँग्रेस उमेदवार रवी ठाकूर यांना ९७३४ मते मिळाली असून ठाकूर यांच्याकडे १७०० मताचं आघाडी आहे. भाजपचे बडे नेते गोविंदसिंह ठाकूर हे मनालीतून लढत असून त्यांनी २६४६८ मते घेतली असून त्यांचे विरोधक भुवनेश्वर कौर यांनी २९३३१ मते घेतली आहेत. त्यांच्याकडे अंदाजे ३ हजार मतांची आघाडी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT