Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE  Sarkarnama
देश

Telangana Chhattisgarh Assembly Results : बीआरएसच्या गडाला सुरुंग; काँग्रेसनं तेलंगणा खेचलं; छत्तीसगडची सत्ता गमावली!

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : तेलंगणात 'बीआरएस', तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला !

Sunil Balasaheb Dhumal

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : बीआरएसच्या गडाला सुरुंग, काँग्रेसनं तेलंगणा खेचलं, छत्तीसगडची सत्ता गमावली!

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकमेव तेलंगणा राज्यात सत्ता मिळवली. बीआरएसच्या सत्तेला सुरुंग लावत, तेलंगणात सत्ता मिळवली आहे. तेलंगणाच्या 119 जागांपैकी काँग्रेसने 64 जागांवर आघाडी घेतली, तर बीआरएसला केवळ 39 जागांवर समाधान मानावे लागले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना कामारेड्डी मतदारसंघातून पराभव पत्कारावा लागण्याची चिन्हे आहेत. कामारेड्डी मतदारसंघातून काँग्रेसचे रेवंथ रेड्डी आघाडीवर असून, मुख्यमंत्री केसीआर दुसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते, तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार आहे. गजवल मतदारसंघातून केसीआर मोठ्या फरकारने आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ भाजपचा तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये भाजपने 56 तर काँग्रेसच्या पदरी केवळ 34 जागा आहेत. यामुळे काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही.

तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमधून रेड्डी रेवंथ रेड्डीसह पक्षाचे वरिष्ठ नेतेही दावा सांगू शकतात, तर छत्तीसगडमध्ये पुन्हा रमण सिंह किंवा इतर नेत्यांची चर्चा होऊ शकते.

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : भाजपचे कटीपल्ली रेड्डी ठरणार 'जायंट किलर!'; केसीआर अन् रेवंथ रेड्डीवर मात

कामारेड्डी मतदारसंघातून काँग्रेसचे रेवंथ रेड्डी आघाडीवर असून, मुख्यमंत्री केसीआर दुसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते, तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार आहे. गजवल मतदारसंघातून केसीआर मोठ्या फरकारने आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ भाजपचा तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार आहे.

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : कामारेड्डीमधून रेवंथ रेड्डी डेंजर झाेनमध्ये, भाजपचे कट्टीपल्ली रेड्डी आघाडीवर

तेलंगणातील कामारेड्डी या मतदारसंघातून रेवंथ रेड्डी डेंजर झोनमध्ये, भाजपचे कट्टीपल्ली रेड्डी आघाडीवर! कामारेड्डी मतदारसंघात ट्विस्ट, भाजपची आघाडी, केसीआर दुसऱ्या तर रेवंथ रेड्डी तिसऱ्या स्थानावर

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : तेलंगणात सहा उमेदवार विजयी!

तेलंगणात आतापर्यंत सहा उमेदवार विजयी झाले असून, यामध्ये काँग्रेसचे चार तर भारत राष्ट्र समितीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : तेलंगणात काँग्रेसचा पहिला उमेदवार विजयी -

तेलंगणामध्ये काँग्रेसचा पहिला विजयी निकाल जाहीर, जुक्कल मतदारसंघातून लक्ष्मीकांता राव विजयी, बीआरएसचे हणमंत शिंदे पराभूत!

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE :तेलंगणात पहिला विजय...

कुतुबुल्लापूर मतदारसंघातून बीआरएसचा पहिला उमेदवार विजयी. के पी विवेकानंद यांचा विजय झाला आहे.

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : तेलंगणात भाजपला तब्बल आठ जागा, अपेक्षापेक्षा जास्त यश...

तेलंगणात भाजपच्या पदरात अपेक्षेपेक्षा जास्त जागा पदरात पडताना दिसत आहे. भाजप येथे आठ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या आणि मागील कामगिरीच्या मानाने भाजपला चांगले यश मिळाले आहे.

Chhattisgarh Assembly Results LIVE : छत्तीसगडचा आकडा बदलला; काँग्रेस बॅकफूटवर...

सुरुवातीच्या कलातून छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आघाडी मिळत होती. परंतु, आता आकडा बदलला आहे. एकूण 90 जागांपैकी भाजप 50 तर काँग्रेसला केवळ 38 जागांवर आघाडी मिळत आहे. इतर दोन जागांवर अपक्षांना आघाडी मिळाली आहे.

Telangana Assembly Results LIVE : केसीआरपुढे रेवंत रेड्डींचे आव्हान...

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : कामरेड्डीतून केसीआरपुढे रेवंत रेड्डींचे आव्हान. केसीआर कामरेड्डीतून तिसऱ्या क्रमांकावर तर गजवल मतदारसंघातून केसीआर आघाडीवर..

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE : तेलंगणात काँग्रेसनं सत्ता खेचली; केसीआर यांचा गड कोसळला...

मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून सत्ता खेचून काँग्रेसने तेलंगणात सरकार बनवणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. 119 जागांपैकी काँग्रेसने 66 जागा, तर बीआरएसने 45 जागांवर आघाडी मिळवली आहे.

Telangana & Chhattisgarh Assembly Results LIVE : मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव दोन्ही मतदारसंघांतून पिछाडीवर...

तेलंगणात सध्या हाती येत असलेल्या आकड्यांनुसार सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत. केसीआर गजवल आणि कामारेड्डी या दोन्ही मतदारसंघांतून पिछाडीवर असल्याचे आकडे सांगतात.

Telangana Assembly Results LIVE  तेलंगणात काँग्रेसचं तुफान तर केसीआर यांचं गुलाबी वादळ शमलं...

तेलंगणातील 119 जागांच्या कलानुसार काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट. काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे, तर बीआरएस केवळ 42 जागांवर आघाडीवर. भाजप आठ जागांवर तर एमआयएम चार जागांवर आघाडीवर आहे.

भाजपचा हिंदू चेहरा टी. राजा पिछाडीवर; अझहरुद्दीन, ओवेसी पुढे

काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन हे ज्युबिली हिल्स मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भाजपचा हिंदू चेहरा असलेले टी. राजा सिंह हे गोशामहल मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. चंद्रायनगुट्टा मतदारसंघातून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत.

तेलंगणात मुख्यमंत्री केसीआर यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गजवल आणि कामारेड्डी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सध्या मात्र ते या दोन्ही ठिकाणी पिछाडीवर आहेत. परिणामी केसीआर यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

छत्तीसगडमध्ये सत्ता राखू : काँग्रेस

छत्तीसगडसह इतर राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आज जे निकाल येतील ते आमच्या अपेक्षापेक्षाही चांगले असतील, आम्ही छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत येणार आहोत. तसेच तेलंगणामध्येही आम्ही सत्ता स्थापन करू, असा विश्वास काँग्रेसचे नेत पवन खेरा यांनी व्यक्त केला आहे.

नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त

निवडणुकीच्या सुरुवातीलाच नक्षलवाद्यांनी मानपूर मतदारसंघातील सरखेडा या गावामध्ये भाजप नेत्याची हत्या झाली होती. त्यामुळे आज होत असलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. विशेषत: सीमावर्ती नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. यामध्ये छत्तीसगडमधील बस्तर, मोहलामानपूर, अंबागड या ठिकाणी पोलिसांची अधिक कुमक तैनात आहे.

छत्तीसगडमधून मुख्यमंत्री भूपेश बघेल आघाडीवर

छत्तीसगडमधील पाटन मतदारसंघातून काँग्रेस नेते मुख्यमंत्री भूपेश बघेल आघाडीवर आहेत. तर तेलंगणात काँग्रेस 'बीआसएस'च्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहे.

छत्तीसगडमध्ये मतमोजणीला सुरुवात

छत्तीसगडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत 29 जागेचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये 15 मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहेत.

Congress Vs BJP : छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, की भाजप बाजी पलटणार; जनादेश कोणाला ?

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या 90 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर थोड्यावेळातच निकालाचे कल यायला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्ता स्थापनेची संधी मिळणार की, बघेल यांची बाजी पलटवत भाजप सत्तेत येणार याचा फैसला आज होणार आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये कांटे की टक्कर, तर तेलंगणात सत्ताधारी बीआरएसला काँग्रेस आसमान दाखणार ?

देशात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका आहेत. यातील पहिल्या चार राज्यांचा निकाल आज लागणार आहे. मतदानानंतर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार असल्याचे पुढे आले.

'एक्झिट पोल'च्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल आहे. मात्र, काही संस्थाच्या मते या ठिकाणी काटे टक्कर पाहायला मिळू शकते. मतमोजणी सुरू होताच निकाल स्पष्ट होणारच आहेत. मात्र, तोवर सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे.

छत्तीसगडमध्ये आम्हीच सत्तेत येणार : रमणसिंह

दरम्यान, आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडमध्ये भाजप बहुमताने सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे. भाजप 42 ते 55 जागांवर विजयी होईल, असा विश्वास रमणसिंह यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस घाबरली असून जेव्हा जेव्हा काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर असते तेव्हा ते ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करतात. मात्र आता काँग्रेसचा पराभव हा निश्चित आहे, छत्तीसगडच्या जनतेने काँग्रेस सरकारला नाकारले असल्याची प्रतिक्रिया साव यांनी दिली.

तेलंगणा राज्यात सत्ताधारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज आलेल्या एक्जिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

तेलंगणात बीआरएसने सत्ता राखण्याचा विश्वास व्यक्त केला, तर काँग्रेस सरकार स्थापनेसाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. भाजप मात्र शांत असल्याचे दिसले.

तेलंगणात सध्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात बीआरसची सत्ता आहे. 2018 मध्ये बीआरएसने 88 जागा पटकावत एकहाती सत्ता स्थापन केली. या बीआरएसच्या सत्तेला काँग्रस सुरूंग लावण्याच्या तयारीत आहे.

तेलंगणात काँग्रेसला 70 हून जास्त जागा मिळण्याचा अंदाज एक्जिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्याला दुजोरा देत काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डींना काँग्रेस तेलंगणात मोठा पक्ष ठरणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, 70 हून कमी जागा मिळाल्या तर काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची तयारीही केल्याची माहिती कर्नाटचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT