देश

Assembly Elections Vote Results 2023: मध्य प्रदेशमध्ये फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या पथ्यावर ...

Sudesh Mitkar

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेश विधानसभेच्या (Madhya Pradesh Assembly Election) 230 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. आज (रविवारी ) मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या निकालात भाजपने आघाडी घेतली असून, भाजप बहुमताच्या जवळ पोचले आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस राबवून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आपलेसे केले ते आता भाजपच्या पथ्यावर पडताना दिसत आहे, तर त्याचा काँग्रेसला फटका बसल्याचे चित्र सुरुवातीच्या निकालामध्ये दिसत आहे.

ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होणार ?

मध्य प्रदेशात भाजपचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर चंबळमध्ये आघाडी घेतल्याचे चित्र सध्या पाहिला मिळत आहे, तर त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. त्यामुळे आता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात का ? हे पाहावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जात आहेत. कोणता पक्ष बहुमताकडे वाटचाल करतोय हे दुपारी दोननंतरच कळेल. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. मध्य प्रदेशातील काही विधानसभा जागांवर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, कैलाश विजयवर्गीय, ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद सिंग पटेल हे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रमुख चेहरे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT