Flag Hoisting: भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन नुकताच पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तसंच देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्री, आमदार-खासदार तसंच विविध संविधानिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांनी आपल्या कार्यालयांच्या आवारात झेंडावंदनाचा कार्यक्रम केला. यावेळी अभिमानानं राष्ट्रध्वज फडकावला, देशभक्तीपर गीतं वाजवली, गायली गेली. सगळीकडं स्वातंत्र्यदिनं उत्साहाचं वातावरण होतं. पण याच दिवशी एक मोठी गडबड झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसनं नव्हे तर दुसऱ्याच एका पक्षानं चक्क राष्ट्रध्वज समजून काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज समजून काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा प्रकार हा केरळमध्ये घडला आहे. केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या CPI (M) कार्यकर्त्यांनी हा घोळ घातला. कोचीमधील इल्लूर इथं स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला चुकून हा प्रकार घडला. CPIच्या कार्यकर्त्यांसाठी हा अत्यंत लाजीरवाणा असा प्रसंग ठरला. एकतर केरळमध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून त्यानंतर त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली.
व्हिडिओनुसार, सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी चुकून झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसचा झेंडा दोरीला बांधला, पण आपली गंभीर चूक लक्षात आल्यानंतर लगेचच १० मिनिटांत त्यांनी आपली चूक दुरुस्त केली आणि भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. यावर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. आपल्याकडून गोंधळ झाल्याचं दाखवणं टाळताना त्यांनी म्हटलं की, "केवळ १० मिनिटेच हा प्रकार घडला त्यानंतर चूक लक्षात येताच लगेलच तो झेंडा खाली उतरवण्यात आला"
सीपीआयचे खासदार संतोष कुमार यांनी यावर म्हटलं की, "भाजपनं उगाचच या प्रकारावरुन वाद सुरु केला आहे. काहीतरी चुकीचं घडल्याचं लक्षात आल्यानंतर काही सेकंदातच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती चूक सुधारली. पण भाजपच्या लोकांनी अशा प्रकारचे कितीतरी गोंधळाचे प्रकार केल्याचं मी सांगू शकतो. भाजपच्या लोकांना जन गन मन...किंवा वंदे मातरम्...ही राष्ट्रीय गीतं देखील बिनचूक म्हणता येत नाही"
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी या प्रकारावर भाष्य करताना म्हटलं की, "जेव्हा तुम्ही 'भारत माते'पेक्षा हमास किंवा पीएफआयची स्तुती जास्त करता तेव्हा असंच घडतं. जेव्हा तुमचे अजेंडे गोंधळलेले असतात. ऑपरेशन सिंदूरला विरोध, पाकिस्तानचं कौतुक तुम्ही करता. तुमचं संपूर्ण मॉडेलच काँग्रेस आहे.
काँग्रेस देखील दहशतवादी गटांची स्तुती करते. त्यांना हमासबद्दल, भारतविरोधी घटकांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे. ते पहलगाममधील दहशतवाद्यांना देखील क्लीनचिट देतात" तसंच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला देण्यात आलेल्या 'व्हीव्हीआयपी वागणूक' बद्दलही पूनावाला यांनी केरळ सरकारवर टीका केली. पण काँग्रेसनं अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.