Girish Mahajan On Ajit Pawar :  Sarkarnama
देश

Girish Mahajan On Ajit Pawar : '20 वर्षे अजितदादांनी एक रूपयाही दिला नाही; महाजन असं का म्हणाले?

Girish Mahajan On Ajit Pawar : "मात्र आम्ही आता मित्र झालो आहोत. माझं ते कौतुक करत होते."

Chetan Zadpe

Pune News : भाजप नेते सनी निम्हण यांनी आयोजित केलेल्या पुण्यातील एका कार्यक्रमात महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची प्रशंसा केली. महाजन यांच्या फिटनेसबद्दल पवारांनी त्यांची स्तुती केली. यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांनी तुमच्या फिटनेसबद्दल तुमचं कौतुक केलं आहे, असा प्रश्न विचारले असता. महाजन म्हणाले,"आज मैत्रीचादिवस आहे. अजित पवारांचा आणि माझा सुरूवातीपासून एकमेकांना राजकीय विरोध होता. अजित पवारांनी आपल्या वीस एक वर्षांच्या कार्यकाळात सरकारमध्ये असताना माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही कधी दिलेला नव्हता. त्यांनी मला एकदा आव्हान दिलं होतं की, तुझ्या मतदारसंघासाठी एक रूपयाही देणार नाही. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. मात्र आम्ही आता मित्र झालो आहोत. माझं ते कौतुक करत होते."

अजित पवार जेव्हाही मला भेटतात, तेव्हा ते माझे दंड बघतात, विचारता कसं केलं. मी त्यांना म्हणतो, दादा यासाठी रोज व्यायाम करायला पाहिजे. दररोज एक तास जिमध्ये घालवतो. खाण्यापिण्यावर माझं पत्थ्यं आहे. तळलेले पदार्थ मी खात नाही. हाँटेलमधलं काही खात नाही. प्रवासात जरी असलो तरी घरचं जेवण करतो. कधी - कधी कार्यकर्त्यांकडून डब्बा मागवून घेतो आणि गाडीतच जेवतो. केवळ राजकारणी लोकांनीच नव्हे, या गोष्टी केल्या पाहिजेत," असे गिरीश महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT