Rabri Devi  Sarkarnama
देश

राबडीदेवींचा रुद्रावतार पाहून लालूंचे कार्यकर्ते मागे हटले अन् सीबीआय अधिकारी सुटले

लालूप्रसाद यादवांवर सीबीआयचे छापे अन् मॅरेथॉन चौकशी

सरकारनामा ब्युरो

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) भ्रष्टाचारप्रकरणी लालूंशी निगडित १७ ठिकाणांवर छापे मारले. पाटण्यात लालूंच्या निवासस्थानी मात्र, या वेळी मोठं नाट्य पाहायला मिळालं. सीबीआय अधिकाऱ्यांना रोखणाऱ्या लालूंच्या कार्यकर्त्यांना संतप्त राबडीदेवींना (Rabri Devi) प्रसाद दिला. (Lalu Prasad Yadav News Updates)

सीबीआयने काल (ता.२०) लालूंच्या पाटण्यातील निवासस्थानी छापा मारला. त्यावेळी मोठ्या संख्येने आरजेडीचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सीबीआय अधिकाऱ्यांचा निवासस्थानाबाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी रोखला. कार्यकर्ते हे पोलिसांनी जुमानत नव्हते. हे पाहून लालूप्रसाद यांच्या पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडीदेवी संतापल्या. त्या आणि त्यांचे पुत्र तेजप्रताप हे कार्यकर्त्यांमध्ये घुसले. त्यांनी कार्यकर्त्यांनी सुनावले.

सीबीआय अधिकाऱ्यांनी लालूंशी गैरवर्तन केलं आणि असंसदीय भाषा वापरली, आरोप करत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या वेळी मागे न हटणाऱ्या कार्यकर्त्यांना राबडीदेवींनी फटकेही दिले. त्यांचा हा रुद्रावतार पाहून कार्यकर्ते अखेर मागे हटले. याचवेळी तिथे असलेले सीबीआय अधिकारीही चपापले. कार्यकर्ते मागे हटल्यानंतर सीबीआय अधिकारी लालूंच्या निवासस्थानातून बाहेर पडले. आता राबडीदेवींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना राबडीदेवींनी धडा शिकवल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

जमीन घेऊन रेल्वेत नोकरी देण्याशी संबंधित ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. तत्कालीन मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' सरकारमध्ये लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते. लालू, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, मुलगी मिसा भारती, हेमा यादव यांच्यासह १६ जणांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीसह बिहारमध्ये विविध ठिकाणी सीबीआयनं ही छापेमारी केली. नोकरी देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्यांचीही चौकशी सीबीआयनं केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT