Shinzo Abe passed away,  Japan Politics news updates
Shinzo Abe passed away, Japan Politics news updates 
देश

भारताने मित्र गमावला; जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारताचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज सकाळी त्यांच्यावर एका ४२ वर्षीय हल्लेखोरेना गोळ्या घालून हल्ला केला होता. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, दरम्यान उपचारादरम्यान आबे यांचे निधन झाले आहे. जपानच्या स्थानिक प्रसार माध्यमांनी याबाबातचे वृत्त दिले आहे. भारतात ANI ने देखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी आबे यांच्यावर गोळीबार झाडणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली आहे. ४२ वर्षीय हल्लेखोराकडून बंदूक जप्त केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने गोळी का मारली हे देखील स्पष्ट झालेले नाही. (Shinzo Abe passed away latest news)

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीचा प्रचार करत होते. जपानमध्ये रविवारी (१० जुलै) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे तेथे प्रचारासाठी गेले होते. तेव्हा संबंधित संशयिताने त्यांच्या जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याजवळ जाऊन अचानक बंदुकीने गोळ्या झाडल्या. अशा स्थितीत घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

भाषण देताना अचानक गोळी लागल्याने आबे कोसळले. त्याचवेळी त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आबे यांच्या निधनाचे वृत्त समजताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

शिंजो आबे कोण आहेत?

67 वर्षीय शिंजो आबे हे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाशी संबंधित आहेत. आबे 2006-07 दरम्यान पंतप्रधान होते. आबे हे आक्रमक नेते मानले जातात. शिंजो यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता ज्यामुळे त्यांना 2007 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंजो आबे सलग २८०३ दिवस (७ वर्षे ६ महिने) पंतप्रधान होते. यापूर्वी हा विक्रम त्याचे काका इसाकू सैतो यांच्या नावावर होता.

विशेष म्हणजे शिंजो आबे यांनी आपल्या कार्यकाळात सर्वाधिक वेळा भारताला भेट दिली. शिंजो आबे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (2006-07) पहिल्यांदा भारतात आले होते. शिंजो आबे यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात (2012-2020) तीनदा भारताला भेट दिली. जानेवारी 2014, डिसेंबर 2015 आणि सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी भारत दौऱ्यावर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT