Shanti Bhushan
Shanti Bhushan  Sarkarnama
देश

Shanti Bhushan Passes Away : माजी कायदे मंत्री तथा ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचं निधन

सरकारनामा ब्यूरो

Shanti Bhushan Death : माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील शांती भूषण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९७ वर्षाचे होते. त्यांनी दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. वरिष्ठ वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. प्रशांत भूषण हे त्यांचे पुत्र आहेत.

अलाहाबाद न्यायालयातील राज नारायण या प्रसिद्ध खटल्यातील ते नारायण यांचे वकील होते. या खटल्यादरम्यान त्यांच्या युक्तिवादामुळे सन १९७४ मध्ये इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली होती. तसेच पुढील सहा वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील शांती भूषण यांनी भ्रष्टाचार आणि नागरी स्वातंत्र्यासाठी अनेक कायदेशीर लढाया दिल्या आहेत. तसेच १९७७ ते १९७९ या दरम्यान, त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांच्या मंत्रिमंडळात भारताचे कायदे मंत्री म्हणून काम पाहिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT