Dayanand Narvekar sarkarnama
देश

गोव्यात 'आप'ला मोठा झटका ; माजीमंत्री दयानंद नार्वेकरांचा राजीनामा ; अपक्ष लढणार

नार्वेकर 1977 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. 1985 ते 1990 दरम्यान ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) आम आदमी पार्टीला (AAP) मोठा झटका बसला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर (Dayanand Narvekar) यांनी 'आप'ला सोडचिठ्ठी दिली आहे. ते अपक्ष म्हणून लढणार आहे.

आप आदमी पक्षातील वजनदार नेते म्हणून नार्वेकरांची ओळख होती. 'आप'चा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण स्वतंत्रपणे निवडणुक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या राजीनाम्याने 'आप'मधील मोठ नेतृत्व गेल्याचे बोललं जात आहे.

दयानंद नार्वेकरांनी आँक्टोबर २०११ मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. यापूर्वी ते ३५ वर्ष कॉग्रेसमध्ये होते. सध्या 'आप'ने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) पर्वरीतून रितेश चोडणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळेच नार्वेकर (Dayanand Narvekar) हे 'आप' मधून बाहेर पडले आहेत. ते पर्वरी (Porvorim) मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढणार आहेत. त्यांनी प्रचार देखील सुरु केला आहे.

नार्वेकरांच्या राजकीय जीवनावर नजर टाकली तर लक्षात येते की त्यांच्यावर अनेक वेळा भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. त्यांना अटकही झाली होती. 2002 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक दिवसीय सामन्यांची बोगस तिकिटे छापल्याच्या आरोपात नार्वेकर आहेत. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. 2009 ते 2012 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष असलेले दयानंद नार्वेकर यांच्यावर रियल इस्टेट घोटाळ्याचाही आरोप आहे.

नार्वेकर 1977 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. 1985 ते 1990 दरम्यान ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदेही त्यांनी भूषविली आहेत. 35 वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.

दयानंद नार्वेकरांनी आँक्टोबर २०११ मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ''अनेकांनी मला पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या. परंतु मी ‘आप’ची निवड केली, असे नार्वेकर यांनी ट्विट केले होतं. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या नार्वेकरांना आप पक्षात प्रवेश दिल्याने ‘आप’चे कार्यकर्ते चकीत झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT