Congress  File Photo
देश

काँग्रेसला दे धक्का : माजी आमदारापाठोपाठ कार्यकारी अध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी

मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला सतत धक्के बसत आहेत.

सरकारनामा ब्युरो

भूवनेश्वर : मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला (Congress) सतत धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांचा हात धरला आहे. आता ओडिशा (Odisha) या राज्यांतही पक्षाला धक्का बसला असून थेट कार्यकारी अध्यक्षांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याबाबत त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे.

ओडिशाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रदीप मांझी (Pradeep Kumar Majhi) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते नबरंगपूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेस सोडण्याची चर्चा होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पक्षात उत्साहाची कमी असल्याचे म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार कैलाश कुलेसिका (Kailas Culesika) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत सत्ताधारी बिजू जनता दलामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर मांझी यांनीही पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाची विश्वासार्हता जवळपास संपली आहे. लोकांचा पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी खूप काळ जावा लागेल. मी मनावर दगड ठेवून पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहे. गरजुंची सेवा करण्यासाठी मी उत्साहाने पक्षात सामील झालो होतो. त्यानंतर पक्षाने मला खूप संधी दिली तसेच पक्षाच्या उच्च पदही दिले, असे मांझी म्हणाले आहेत.

मांझी हेही सत्ताधारी बीजेडीमध्ये लवकरच प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसने मांझी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षावर काही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. आमदार तारा प्रसाद बहिनीपती म्हणाले, मांझी आणि त्यांचे जवळचे सहकारी कुलेसिका हे पक्षाविरोधात काम करत होते. असे बंडखोर पक्षातून गेल्याने चांगले झाल्याचे ते म्हणाले.

मांझी हे 2009 च्या लोकसभा मतदारसंघाते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांचा विजय झाला होता. पण त्यानंतर 2014 व 2019 च्या निवडणुकीत बीजेडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. त्यांना प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. सध्या ते प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT