Pakistan PM Imran Khan:
Pakistan PM Imran Khan: 
देश

Pakistan PM Imran Khan: पाकिस्तानात हालचालींना वेग; इमरान खान यांना अटक होणार?

सरकारनामा ब्युरो

Pakistan PM Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. लाहोर पोलिसांनी इमरान खान यांच्या लाहोरमधील जमान पार्कमधील घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी प्रवेश केला. आज सकाळीच इमरान खान कोर्टात हजर राहण्यासाठी इस्लामाबादला निघाले असता पोलिसांनी त्याच्या घरात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या (पीटीआय) 20 हून अधिक सदस्यांना पोलिसांनी अटक केली. इमरान खान यांच्या घराच्या बाजूने गोळीबार झाला. मात्र यात कोणीही जखमी झाले नाही. इमरान खान यांच्या घराला छावणीचे स्वरुप आले उभारली आहे.

इमरान खान यांनी स्वतः ट्विट करून त्यांच्या घरी पोलिसांच्या या कारवाईची माहिती दिली. पंजाह पोलिसांनी जमान पार्कमधील माझ्या घरावर हल्ला केला, मी घरात नाही आणि बुशरा बेगम घरी एकट्या आहेत. पण पोलिसांनी कोणत्या कायद्यानुसार ही कारवाई केली आहे?

तोशाखाना प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी इमरान अटक करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला होता.पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांची पुढील रणनीती काय असेल यावर आता काही सांगता येत नसले तरी इमरान खान यांच्यावरील कारवाईनंतर परिस्थिती आणखी बिघडू शकते,असे मानले जात आहे.

याआधी स्वत: इमरान खान यांनीच आपल्यावरील आरोप हे सूडाच्या राजकारणातून प्रेरित असल्याचा आरोप केला होता. विरोधकांना आपलाआवाज दाबायचा आहे, पण पाकिस्तानचे लोक त्यांच्याबाबतीत असे घडू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, इमरान खान यांना कोर्टात पक्षाच्या फक्त 6 नेत्यांना सोबत हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे वकील आणि इम्रान खान यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींशिवाय बाहेरच्या व्यक्तीला कोर्टाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. असे सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT