pandit sukh ram News, Pandit Sukh ram passes away
pandit sukh ram News, Pandit Sukh ram passes away sarkarnama
देश

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीयमंत्री पंडित सुख राम यांचे निधन

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress leader), माजी केंद्रीयमंत्री पंडित सुख राम (pandit sukh ram) यांचे निधन झाले. नवी दिल्लीत एका रुग्णालयात त्यांच्यावर ७ मे पासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Pandit Sukh ram passes away)

पंडित सुख राम (वय ९४ ) यांना मनाली येथे ४ मे रोजी ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ७ मे रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे आज त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे नातू अक्षय शर्मा यांनी फेसबूकवरुन दिली आहे.

अक्षय यांनी त्यांच्यासोबतचा लहानपणाचा फोटो शेअर केला आहे. "अलविदा दादाजी,अभी नहीं बजेगी फोन की घंटी," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हिमाचलप्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur)यांनी ७ मे रोजी त्यांना मंडी येथील रुग्णालयातून हवाई रुग्णवाहिकेतून दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.

पंडित सुख राम यांचे पार्थिव नवी दिल्ली येथून मंडी येथे आणले जाणार आहे. त्यानंतर हनुमान घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ते मंडी लोकसभेचे खासदार होते. ते पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. १९९६मध्ये ते मंत्री असताना त्यांना एका भष्ट्राचार प्रकरणी २०११ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT