PM. Narendra Modi , P.T.Usha
PM. Narendra Modi , P.T.Usha Sarkarnama
देश

P.T.Usha,इलैयाराजांसह चार दिग्गजांची राज्यसभेवर वर्णी; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

सरकारनामा ब्यूरो

PT Usha : भारताची महान धावपटू पी.टी. उषा, (P.T. Usha) प्रसिद्ध संगीतकार इलय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर (Rajyasabha) नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपतीच्या कोट्यातून निवड झाली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चार जणांना राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्यासाठी ट्वीट करत लिहिले की, पी.टी उषाजी या प्रत्येक भारतीयांसाठी एक प्रेरणा आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ओळखली जाते, नवोदित खेळाडूंना गेल्या काही वर्षांत मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्य तितकेच प्रशंसनीय आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा शब्दात त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये मोदींनी इलैयाराजा यांचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, राजा जी यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचं काम अनेक भावनांचे सुंदर चित्रण करते. त्यांचा जीवन प्रवास देखील प्रेरणादायी आहे. ते एका हालाखीच्या परिस्थितीतून वर आले असून त्यांनी बरेच काही साध्य केले आहे. त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

तिसरे राज्यसभेचे उमेदवार म्हणजे वीरेंद्र हेगडे यांच्याबद्दल मोदी म्हणाले की, वीरेंद्र हेगडे जी समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची तसेच शिक्षण, संस्कृती आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मोठ्या कार्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, ते नक्कीच संसदीय कामकाजास समृद्ध करतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तर व्ही. विजयेंद्र प्रसाद गरू यांच्याबद्दल मोदींनी लिहिले की, व्ही. विजयेंद्र गरू हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी निगडीत आहेत. त्यांच्या कार्यातून भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडले आहे आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटवला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा शब्दात मोदींनी या चारही जणांचे अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT