freedom fighter H S Doreswamy won battle against covid 19
freedom fighter H S Doreswamy won battle against covid 19  
देश

जिद्दीला सलाम! 103 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाने आता कोरोनालाही हरवले

वृत्तसंस्था

बंगळूर : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट (Second Wave) आली असून, अतिशय विदारक चित्र सगळीकडे दिसत आहे. यातच काही आशेचे किरणही समोर येताना दिसत आहे. 103 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाने (Freedom Fighter) आता कोरोनाला हरवले आहे. ते रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले असून, त्यांच्या इच्छाशक्तीचे सगळीकडून कौतुक होत आहेत. (freedom fighter H S Doreswamy won battle against covid 19)

एच.एस.दोरेस्वामी हे 103 वर्षांचे आहेत. ते प्रख्यात गांधीवादी नेते असून, स्वातंत्र्यसैनिक आहेत. दोरेस्वामी यांना 5 दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांना श्वसनास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

दोरेस्वामी यांना श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च या स्वायत्त सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे संचालक डॉ.सी.एन.मंजुनाथ हे प्रख्यात हृदयरोगतज्ञ आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे जावई आहेत. त्यांनीच दोरेस्वामी यांच्यावर उपचार केले. 

दोरेस्वामी यांचा जन्म 10 एप्रिल 1918 रोजी झाला. चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना 1943 ते 1944 या दरम्यान 14 महिने कारावास झाला होता. गांधीवादी असलेले दोरेस्वामी म्हैसूर चलो या चळवळीतही सहभागी झाले होते. म्हैसूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी ही चळवळ करण्यात आली होती. आताही अनेक आंदोलनात दोरेस्वामी यांचा सक्रिय सहभाग असतो. 

हेही वाचा : दिलासादायक : नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 48 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 205 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 175 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. नवीन रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 40 हजार 956, कर्नाटक 39 हजार 510, केरळ 37 हजार 290 रुग्ण आढळले आहेत. 

देशातील कोरोना मृत्यू दर 1.09 टक्के आहे. मागील 24 तासांत 4 हजार 205 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 793 मृत्यू नोंदवण्यात आले असून, त्याखालोखाल कर्नाटकात 480 मृत्यू झाले आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोना लशीचे 17.52 कोटी डोस देण्यात आले आहेत. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT