दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयने (CBI) देशाची महारत्न कंपनी गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग संचालक इ. एस रंगनाथन (E S Ranganathan) यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. तसेच सीबीआयने (CBI Action) राजधानी दिल्लीसह नोएडा आणि इतर काही ठिकाणी छापेमारी करत लाखो रुपये जप्त केले आहेत. याशिवाय या छाप्यांमध्ये काही महत्वपूर्ण कागदपत्र देखील सीबीआयच्या हाती लागले आहेत.
सीबीआयच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सीबीआयने एका लाचखोरीच्या प्रकरणात इ. एस रंगनाथन यांच्यावर ही कारवाई केली आहे. लाचखोरी आणि पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी आणि डिस्काउंटशी संबंधित हे प्रकरण आहे. याबद्दल सीबीआयला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील कारवाई सुरु होती.
या कारवाईत एकूण ५ जणांना अटक करण्यात आले असून यात गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग संचालक इ. एस रंगनाथन, दिल्लीचे पवन गौड, गुडगावचे एन. रामकृष्णन नायर, मेसर्स ऋषभ पॉलिकेम प्रायवेट लिमिडेटचे संचालक राजेश कुमार, चंडीगडच्या मेसर्स युनायटेड पॉलिकेम इंडस्ट्रीजचे सौरभ गुप्ता, हरियाणातील मेसर्स बंसल एजन्सीजचे आदित्य बंसल यांचा समावेश आहे.
सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार एकूण ४० लाख रुपयांच्या लाचखोरीचे हे प्रकरण आहे. पेट्रोलियम उद्योगाशी संबंधित एका उद्योगपतीने संचालक इ. एस रंगनाथन यांच्यावर ४० लाखांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. याच तक्रारीनंतर रंगनाथ यांच्यावर कारवाई करत सीबीआय टीमने दिल्ली, नोएडा, हरियाणाच्या गुरुग्राम, पंचकुला, करनाल अशा ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान सीबीआने ८४ लाख रुपये रोख जप्त केले आहेत. यातील तब्बल ७५ लाख गुरुग्राममधून जप्त करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.