Gujarat Election 2022 Result Updates sarkarnama
देश

Gujarat Election 2022 Updates : भाजप ऐतिहासिक विजयाच्या वाटेवर..

Gujarat Election 2022 Result Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामा ब्युरो

गुजरातमध्ये काँग्रेस १९ जागांवर पुढे आहे.भाजप १५४ तर आप ६ जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजय नोंदवताना दिसत आहे. मतमोजणीच्या कलानुसार, भाजपने 182 पैकी 149 जागांवर आघाडी घेतली असून 6 जागा जिंकल्या आहेत. या ट्रेंडचे निकालात रूपांतर झाल्यास भाजप 1958 मधील काँग्रेसचा सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम मोडेल.

यंदाच्या निवडणुकीसाठी सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस पार भूईसपाट झाल्याचं चित्र आहे. १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक कमी म्हणजेच ३३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, सध्या हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस २५ चा आकडाही पार करू शकणार नाही, असा दावा राजकीय तज्ज्ञांकडून केला जातोय.

गुजरातमध्ये काँग्रेसची दाणादाण झाली आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट आहे. सुरतमध्ये १६ पैकी १५ जागांवर भाजप आघाडीवर आहे.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मजुरामधून पुढे आहेत. सध्या येथे काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुतियानामध्ये लेडी डॉन संतोकबेन जडेजा यांचा मुलगा कंधल जडेजा आघाडीवर आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

सुरतच्या कतारगाममधून आपचे गोपाल इटालिया आघाडीवर आहेत. भाजप-काँग्रेस आणि आप यांच्यात तिरंगी लढत आहे. खंभालिया मतदारसंघातून आपचे मुख्यमंत्री उमेदवार इशुदान गढवी पिछाडीवर आहेत. येथे भाजप पहिल्या क्रमांकावर आहे.

विरमगाममध्ये हार्दिक पटेल आपचे अमरसिंह ठाकोर यांच्या मागे आहेत. यापूर्वी त्यांनी दावा केला होता की भाजप 135 ते 145 जागा जिंकेल. मोरबीमध्ये भाजपचे कांती अमृतिया आघाडीवर आहेत. मोरबी पुलाच्या दुर्घटनेत लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी मच्छू नदीत उडी मारली होती.

Gujarat Election Results 2022

प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप 110 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीनेही एन्ट्री केली आहे. 3 जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातमध्ये शंभर जागांवर भाजप आघाडीवर आहे. पहिल्या २० मिनिटांमध्ये भाजपमध्ये शतक ठोकले आहे. तर काँग्रेस २२, आप ३ जागांवर आघाडीवर आहे. सुरवातीच्या कलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

पोस्टल मतमोजणीला सुरवात. दोन जागांवर भाजप आघाडीवर

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल आज (गुरुवारी) जाहीर होत आहे.गुजरातमधील 33 जिल्ह्यांमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या.

गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय.

त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुजरातमधील 182 विधानसभा जागांसाठी 37 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांवर नजर टाकल्यास, राज्यात भाजप पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT